‘आजारी माणसांना किंवा आजाराची शंका असणाऱ्यांना औषध घेण्यापासून परावृत्त करणे हे डॉक्टरचे एक महत्वाचे काम आहे’ या अर्थाचे वरकरणी विरोधी भासणारे एक इंग्रजी वचन आहे. यश आणि यशातून मिळणारी प्रसिद्धी याबाबतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेवढी तपश्चर्या करावी लागते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी पचवण्यासाठी, ती डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर रहावेत यासाठी करावी लागते.’अपयशापेक्षा यशानंच माणसं अधिक मुर्दाड होतात’ असं पु. लं. म्हणतात.प्रसिद्धीच्या मागं लसलसून लागणारी आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी माणसं बघीतली की आभाळाएवढी प्रतिभा असूनही जाणीवपूर्वक अज्ञानाच्या काळोखात रहाणारी माणसं अधिकच मोठी वाटायला लागतात.
जी.ए. उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी या खरेतर मराठी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळण्याची योग्यता असलेल्या पण आयुष्यभर गूढपणाच्या वलयात लपून राहून अचानक लुप्त पावलेल्या लेखकाविषयी हेच म्हणता येईल. जी.एं विषयी तुसडा, माणूसघाणा, उर्मट असे असंख्य गैरसमज होते. ‘आय लिव्ह ऑन प्रिज्युडिसेस’ असे मानणाऱ्या जी.एं नी ते दूर करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मराठी साहित्यातील अनेक सन्मान त्यांच्याकडे चालून आले. पण ते नम्रतेने स्वीकारताना जी.एं नी त्या सन्मानासोबत आलेली झळाळी कटाक्षाने बाजूला ठेवली. साहित्यसंमेलने, चर्चा, परिसंवाद, सत्कार याकडे ते फिरकलेही नाहीत. काही मोजके अपवाद सोडले तर जी.एं नी आपले छायाचित्रही कुणाला काढू दिले नाही. ‘रावसाहेबां’ प्रमाणे हार पडले ते त्यांच्या मृतदेहावरच.
कोण होता हा माणूस? १९५० पासून १९८०-८५ पर्यंत मुंबई- पुणे- नाशिक या मराठी साहित्याच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब धारवाडसारख्या अमराठी ठिकाणी राहून मराठी प्रतिभेच्या इतक्या उत्तुंग भराऱ्या घेणारा? आपले लिखाण खूप लोकप्रिय झाल्यानंतरही बरेच दिवस आपल्या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तेच्या छपाईला नकार देणारा? अफाट प्रतिभा, ती व्यक्त करण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी व क्षमता, जगातले सर्व प्रकारचे साहित्य, कला, संगीत याचा अत्यंत सखोल अभ्यास, अव्याहतपणे केलेले अर्थपूर्ण आणि प्रचंड वाचन, कांदेपोह्यापासून चमचमीत कोंबडीपर्यंतची खाद्यरसिकता आणि हे इतके सगळे असतानाच काटेकोरपणे आपले ‘खाजगीपण’ जपणारा?
जी.एं च्या कथांप्रमाणे त्यांचे आयुष्यही एका कोड्यासारखे वाटते. आणि ते तसे आहेही. घरची अत्यंत गरीबी, आई-वडीलांचे अकाली मृत्यू, मायेच्या अशा दोन सख्ख्या बहिणींचेही पाठोपाठ निघून जाणे, त्यामुळे आयुष्यात एक विलक्षण एकाकीपणा, काहीसा कडवटपणाही येणे, पण त्यामुळे जीवनात सगळीकडे भरून राहिलेल्या दुःखाची जाणीव अधिक टोकदार होणे…. हे सगळे जे. एं च्या एखाद्या कथेसारखेच वाटतें. नंदा आणि प्रभावती या दोन मावसबहिणींबरोबर जी.ए. बरीच वर्षे धारवाडात राहिले. स्वतःचे कुटुंब करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नसेलच असे नाही. पण त्या विषयावर त्यांनी कधी चर्चाही होऊ दिली नाही. ( कदचित यामागेही त्यांचे काही ‘खाजगी गूढ?’ ). धारवाडमध्ये ते एक अत्यंत लोकप्रिय इंग्रजीचे प्राध्यापक होते. धारवाडमधील कडेमनी कम्पाउंडमेधील त्यांची ती जुनाट बंगली, तीभोवती जी.एं नी स्वतः खपून केलेली छोटीशी बाग, कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालय, त्यांचा तो खाजगी क्लब, त्यांचे लिखाण,त्यांच्या सिगारेटस, पुण्यामुंबईच्या त्यांच्या साहित्यीक (पत्र)मित्रांशी असलेला अखंड पत्रव्यवहार ,…जी.ए. आनंदात होते. .
पण जी.एं च्या कथेत शोभावासा शोकांत याही गोष्टीला लाभला होता. जी.एं ची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्यांना त्यांच्या सर्वात नावडत्या गावी – पुण्याला यावे लागले. आपल्या हातून आता फारसे काही काम – विशेषतः लिखाण होणार नाही हे जी.एं नी ओळखले आणि ल्युकेमियासारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्याचे साफ नाकारले. एवढेच काय, पण आपल्या बहिणींनाही त्यांनी आपल्या आजाराची कल्पना दिली नाही. नाइलाजाने एकदोन दिवस इस्पीतळात काढून जी.ए. अगदी गुपचुप ‘खाजगीपणाने’ आयुष्यभर त्यांना ज्याची ओढ होती त्या अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले!
पण जी.एं चे वेगळेपण – कुणी त्याला विक्षिप्तपणाही म्हणेल -एवढेच नाही. जी.एं च्या कुठल्याही पुस्तकातले कुठलेली पान काढून बघा.. हे पाणी काही वेगळे आहे हे पटकन लक्षात येते. एवढेच कशाला, जी.एं च्या पुस्तकांची नावे व त्यांच्या अर्पणपत्रिका जरी बघीतल्या तरी या सोनेरी पंखाच्या पक्षाची गगनभेदी झेप दिसून येते. ‘पिंगळावेळ’ हा कथासंग्रह आपल्या वडीलांना अर्पण करताना ते लिहीतातः
तीर्थरूप आबांस,
डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला नीट पहाण्यापूर्वीच
तुमची पावले उंबऱ्याबाहेर पडली होती.
‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना ते म्हणतातः
कै. तीर्थरूप ताईस,
रात्री उशीरा घरकाम करताना
तुला सोबत व्हावी म्हणून
लहनपणी मला समोर बसवून
तू पुष्कळ कथा सांगितल्यास
आता तू गेल्यावर
मला त्या कथांची सोबत आहे
‘काजळमाया’ हा जी.एं चा खूप गाजलेला कथासंग्रह त्यांनी आपल्या मावशीला अर्पण केला आहे. त्याची छोटीशी पण चटका लावणारी पत्रिका पहाः
सोनूमावशीस,
तू आम्हाला आणखी एक आई होतीस.
असाच चटका आपल्याला ‘निळासावळा’ ची पत्रिकाही लावते. फार अकाली गेलेल्या आपल्या तीन बहिणींना हा संग्रह जी.एं नी अर्पण केला आहेः
इंदू, सुशी व जाई
या तीन आठवणींना
आणि ज्या पत्रिकेशिवाय हे लिखाण पूर्णच होऊ शकणार नाही ती ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहाची केवळ अविस्मरणीय, डोळ्यात पाणी आणणारी अर्पणपत्रिकाः
स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातानी आभाळात सोडलेली, पण जिचा मृत्यू असहायपणे खालून पहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या चोचीची चंद्रावळ, मघापर्यंत उत्साहाने पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेने तडफडत ओंजळीत निपचिप झालेला, माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी, अजाण संतापाने पाठीवर सपासप वेत मारल्यावरही ते वळ अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू लागणारी क्षमाशील कृष्णी गाय, आपल्या वासाने पहाट ओली करणारा, पण घरबांधणीच्या वेळी तो काढून टाकायचे ठरताच त्याआधीच दोनचार दिवस आपण होऊन मूकपणे आडवा झालेली पारिजातक, जत्रेमधील फिरते चक्र मला पहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून सात मैल घेऊन जाणारा लंगडा हाडकातडी म्हातारा बसलिंग, ‘कसा पोट जाळतो बघा’ असे आईने म्हणताच ताडकन पानवरून उठून तीन मजली बारा खणी घरातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडून शेवटपर्यंत एकवस्त्री रहाणारा, लाकडे फोडून पोट भरत असता अर्ध्या गावाला जातिवंत मोत्यांची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारे कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार, आतड्याच्या चोवीस माणसांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेली, आता उरलेल्या दोनचार जिव्हाळ्याच्या माणसांना तरी आपल्या प्रेमापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याप्रमाणे मलाही हिडीसफिडीस करण्याची केविलवाणी धडपड करणारी काकाची आई, ‘अरेबियन नाईटस’ मला प्रथम वाचायला देणारा, फुटबॉल खेळण्यासाठी जीव टाकणारा, पण एका अपघातात नेमके दोन्ही पाय गमवून घेतलेला भागिरथ देशपांडे, माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची शिसपेन मला देणारा रुद्राप्पा बेलीफ, स्वतः निरक्षर असूनदेखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे करणारी, मे पहिलीची परीक्षा पास होताच पै पै जमा केलेले पुष्कळसे पैसे खर्च करून पेढे वाटणारी. ठीकठीकाणी वार लावून जेवणारी, आणि एक दिवस अचानक नाहीशी झालेली, कापऱ्या अंगाची, तोतरी, अनाथ, वेडसर रखमाकाकू यांस….
तुम्ही सगळेच जण पुढे निघून गेलात. मी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे कधी येणार नाही. आपण पुढे पुन्हा कधीतरी भेटू.
जी.एं च्या कथा आणि त्यांच्या व्यक्तिरेखा यावर पुन्हा कधीतरी….
सन्जोप राव
सन्जोप राव,
लेख आवडला. जी.एं. च्या साहित्याबद्दल आपण दिलेली माहिती वाचतांना मनात विचार आला की तीव्र दुःखापोटी सहसा अत्युत्कृष्ट साहित्य जन्मास येणे हाही एक योग असावा.
मराठी अनुदिनीविश्वात स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
वा! तुमचं सगळंच लेखन उत्कृष्ट आहे. असेच ते आम्हाला वाचायला मिळत राहो ही सदिच्छा!
GA tar बाप माणुसच! तुम्ही त्याची प्रकाशित झालेली पत्रं वाचलित का?
-मंजिरी
ब्लॉग खूप आवडला. लिहीत रहा, वाचायला आवडेल 🙂 शुभेच्छा!
शैलेश, मन्जिरी, सुमेधा,
धन्यवाद.
माझे काही लेख मनोगत वरही प्रसिद्ध झाले आहेत. ते सवडीने इकडे चिकटवण्याचा प्रयत्न करतो.
सन्जोप राव
जी.एं. चा प्रेमभंग हे त्यांच्या अविवाहित राहण्याचे कारण होते. कमल नावाच्या एका मुलीवर त्यांचे प्रेम होते. गूढयात्री या जी. एंच्या जीवनावर आधारित कादंबरीत खूप माहिती दिली आहे. लेखिका त्यांच्याच एक विद्यार्थिनी आहेत. नाव आठवत नाही.
excellent literature found in this website,
we are very much away from our country and family , but such a wonderful writtings always taking us back to our childhood and to my family.
Thanks a lot.
good effort Sanjop….particularly colleting GA’s dedications……arguably the best parts of his book…..
But GA was hardly a great writer. He sure was very good but greatness is much more and is not defined by Nobel Prize.
In Marathi, our saint-poets (Dnyaneshwar, Tukaram, Ramdas, Eknath) were truly great.
20th century Marathi produced many good writers (none great) and GA was one of them. S K Kolhatkar, R G Gadkari, B S Mardhekar, Arun Kolatkar, Namdeo Dhasal , C V Joshi, Vilas Sarang were few others.
GA himself wrote to me about his limitations when I was IIT, Madras.
In fact, Jaywant Dalwi has written at length about his GA’s hypocrisy. If you read some of GA’s letters, you tend to pity his efforts to butter up the then powers-that-be like Govind Talwalkar.
GA was a sentimental human, good writer, great brother to his cousin sisters but given to all human follies.
Hi
Aniruddha Kulkarni I want to tell you, you are a fullish lad..nothing else.. Bloody!
mananaiy sanjop ray,
g. a.en var aapan khua chan ani nemake lihile aahey. te kharokhar great lekhak hote, Marathi bhasha agadi mahan bhasha tharate ashya lekhakanmule…
Thanks.
chup e anya (anruddh kulkarni),
tula kay kalate…
GA ni tula patr lihil he swatahache bhagy samaj…
akaal pajalu nako jaast
mahamurkh
@Aniruddha Kulkarni
G.A wrote to you about his limitations, that itself is a part of his greatness. First get your English right before commenting on the capabilities of such an ethereal scholar.
very good and informative article.go ahed
Thank you.
Good article and informative too!!
तुमचे सितम्बर 2006 मधील काही लेख उघडत नाहीयेत. कृपया काय error आहे ते तपासा.
आणि जी ए नच्या साखळ्या एकत्र करून एका विभागात संकलित करा .
धन्यवाद.
बघतो. धन्यवाद.
हे अजूनही तसंच आहे.. काय करता येईल?
HE AJUNHI TAS CH AAHE , KAI KARAV?
khup sundar lekh ahe.sir, mala g.a.nch lekhan khup…. avadat.
sir tumhala g.a.nchya jivanavar adharit ”gudhayatri” ya kadambarivishai kahi mahiti asel tar pls. ti upalabdh karun dya
छान लेख