Monthly Archives: फ़रवरी 2007

भात आणि बिर्याणी

भात या खाद्यप्रकाराचे का कुणास ठाऊक, ऐदीपणाशी एक नाते जोडले आहे. ‘गरमगरम तूपभात खाऊन…’ च्या समोर ‘झोपणे’ हेच क्रियापद आपसूकपणे येते! ‘चांगला रबरबीत कालवलेला दहीभात खाऊन तो रणरणत्या उन्हात सायकल हाणीत कामावर गेला’ हे वाक्य काही केल्या मनाला पटत नाही.भातासारख्या … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 19 टिप्पणियाँ

पहिला दिवस -२

रीतू नाडगौडाच्या स्वर्गिय सौंदर्यानं पुरुषवर्गाची अशी पाडापाड चाललेली असताना सर्किट व टग्या अद्यापि गोळेकाकांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या भाषांतरातच अडकले होते. “हे बघ, डोळ्यातल्या डोळ्यात संकेत झाला गं बसल्या बसल्या जगण्याचा आधार झाला गं…” सर्किट. “हां, असं त्या केशवसुमाराच्या हातात कोलित दे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 20 टिप्पणियाँ

पहिला दिवस-1

भांडाभांड विद्यापीठाशी संलग्न ‘मनोगत वादविवाद आणि भांडणकला महाविद्यालय’ चा आजचा पहिला दिवस. आपल्याला पहिल्याच दिवशी उशीर झाला की काय या काळजीने घाबराघुबरा झालेला सर्किट कोपऱ्यावरुन घाईघाईने वळाला तसे शामियान्यातून येणारे भीमसेनअण्णांच्या मारव्याचे सूर त्याच्या कानावर पडले. सर्किटच्या भव्य कपाळावरच्या आठ्यांत … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 24 टिप्पणियाँ

चष्म-ए-बद्दूर – दर्जेदार मनोरंजन!

दूरदर्शनवर कोणत्याही वाहिनीवर चष्म-ए-बद्दूर हा सिनेमा लागलेला असला की अचानक माझ्या हातातला रिमोट काम करेनासा होतो. फारूख शेख, दीप्ती नवल. राकेश बेदी, रवी वासवानी आणि मुख्य म्हणजे सईद जाफरी यांना हाताशी धरून सई परांजपेंनी एक अफलातून धमाल तयार केली ती … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियाँ

महाकवि गालिब

गालिबची ओळख आयुष्यात तशी उशीराच झाली. पण नंतर त्याच्या शायरीत अडकलो तो कायमचाच. भगवदगीतेमध्ये, बायबलमध्ये, कुराणात सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे म्हणतात. मला बाकी आयुष्याबद्दल पडणारे बरेच प्रश्न गालिबच्या कवितेने सोडवून दिले. गंमत बघा, गालिबने आपली शायरी लिहीली ती प्रामुख्याने … पढना जारी रखे

Galib में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियाँ

अपरिचित तलत

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ त्यांची प्रतिभा कमी होती असा नाही. पण यश हे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियाँ

मिलिंद बोकील -आश्वासक लेखन

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कारणाने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. दूरदर्शनवरचे रटाळ कार्यक्रम आणि आपण सातत्याने हरणारे क्रिकेटचे सामने बघून मी बऱ्यापैकी कंटाळलो होतो. त्याच त्याच लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनातही मन लागत नव्हते. अशातच मिलिंद बोकील या नव्या लेखकाचे ‘उदकाचिया … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियाँ