‘दोनो जवानी की मस्ती में चूर…’ या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न! ‘दोनो जवानी की मस्ती में चूर तेरा कसूर न मेरा कसूर ना तूने सिग्नल देखा, ना मैने सिग्नल देखा ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा ऍक्सीडेंट हो गया, ऍग्रीमेंट हो गया, पर्मनंट हो गया रब्बा रब्बा’ शब्बीरकुमारचा आवाज म्हणजे क्या कहने! जुन्या काळात रफी का कोणीतरी होऊन गेला म्हणे, पण शब्बीरच्या आवाजाला जी गेहराई आहे ती रफीच्या आवाजात कुठली यायला! या गाण्यात त्याच्या घनघोर आवाजाला आशा भोसलेची साथ आहे (की अनुराधा पौडवाल? पण काय फरक पडतो?), पण खरं सांगायचं तर ती विशोभितच दिसते. पण ते आपण सोडून देऊ. आता या ओळींमधल्या भावसौंदर्याकडे वळू. किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. जवानीची आंधळी करुन टाकणारी धुंदी! त्यात सिग्नलकडे कुठलं लक्ष असायला! सिग्नलचा दिवा लाल असतानाच गाडी पुढं ढकलली आणि व्हायचं तेच झालं! पण या अपघातातून पुढं काय झालं ते पहा. या दोघांच्या प्रेमाचं ऍग्रीमेंटही झालं आणि ते पर्मनंटही झालं! ‘ऍक्सीडेंट, ऍग्रीमेंट आणि पर्मनंट’ यातली यमकाची गोडी काळजाला हात घालून जाते! आता पुढच्या ओळी पाहू.. ‘हम दो अनाडी न देखा अगाडी, न देखा पिछाडी पटरी पे डाल दी ये दिल की गाडी ना तूने बत्ती देखी, ना मैने झंडी देखी ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ प्रेमात पडलेल्याला गाढवाची, खुळ्याची, कशाची वाट्टेल त्याची उपमा दिली जाते. सौंदर्य हे बघणार्याचा नजरेत असतं हे इथं कवीनं किती सूचकपणे मांडलं आहे पहा! ‘अगाडी’ आणि ‘पिछाडी’ या शब्दांच्या निवडीतला सूचकपणा पहा! प्रियकराचे किंचित सुटलेले पोट पहा, त्याचे जीनच्या प्यांटीतून बाहेर डोकावणारे टेर पहा, पण तरीही प्रेयसीने प्रेमाच्या पटरीवर दिलची गाडी घातलीच! वा! हृदयाला अगदी भिडून जाणारा प्रकार! त्यातून शब्बीरच्या सुराचा घुमाव! खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है.. आता पुढे चलू! ‘राहें शबाब थी उम्रे हिजाब थी तू बेनकाब थी मौसम की भी कुछ नीयत खराब थी ना तूने खतरा देखा, ना मैने खतरा देखा ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ ‘मौसम की नीयत खराब’ ही किती ओरिजीनल कल्पना आहे पहा! तुझ्या चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला आणि तुझा पिंपलाळलेला चेहरा दृष्टीस पडला! मग मौसम तर कसा काबूत राहील? वा! क्या बात है! गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद! चला आता पुढे जाऊ! ‘अरे, नुकसान सारा तो भरना पडेगा, ओ भरना पडेगा अब प्यार हमको करना पडेगा ना तूने सीटी मारी ना मैने सीटी मारी ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ ‘नुकसान सारा’ या शब्दांतला श्लेष पहा. ‘सारा’ म्हणजे शेतसारा – जमीनीचा फाळा हा अर्थ आपण ओळखतोच. सारा म्हणजे संपूर्ण. आता हा अपघात तर झाला पण त्याचा दंड आपल्याला भरायला लागणार, कारण ना तो शिट्टी वाजवली, ना मी. आता उरलेलं आयुष्य आपल्याला शिट्ट्या मारतच घालवायला लागणार असं तर कवीला म्हणायचं नसेल? मंडळी हा तर्क कवीनं किती खुबीनं आपल्यावर सोडला आहे ते पहा! हा लेख मी माझा मित्र चंदू भांदिग्रे याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही व्यावसायिक लोकं खूप त्रास देतात. चंदू आता पुढच्या महिन्यात सुटेल. अगदी माफक नवसागराचा वापर ही त्याची खासियत होती. त्या साल्या सावंत इन्स्पेक्टरनं खायचे ते हप्ते खाल्ले आणि पहिल्या धारेच्या मालाला काही जागला नाही. दुनिया ही अशी बेईमान आहे मंडळी! का माहीत नाही, पण आज अचानक चंद्याची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! त्याची आठवण झाली की मंडळी हातातली स्कॉच कडू लागत नाही हो! शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!
-
पुरालेख
- जनवरी 2014
- सितम्बर 2013
- जून 2012
- अप्रैल 2012
- नवम्बर 2011
- जुलाई 2011
- मई 2011
- अप्रैल 2011
- मार्च 2011
- जनवरी 2011
- दिसम्बर 2010
- मई 2010
- फ़रवरी 2010
- नवम्बर 2009
- अक्टूबर 2009
- अगस्त 2009
- जुलाई 2009
- जून 2009
- मई 2009
- अप्रैल 2009
- मार्च 2009
- दिसम्बर 2008
- सितम्बर 2008
- अगस्त 2008
- जुलाई 2008
- जून 2008
- मई 2008
- मार्च 2008
- फ़रवरी 2008
- अक्टूबर 2007
- सितम्बर 2007
- अगस्त 2007
- जून 2007
- मई 2007
- अप्रैल 2007
- मार्च 2007
- फ़रवरी 2007
- दिसम्बर 2006
- अक्टूबर 2006
- सितम्बर 2006
-
मेटा
उ.वर मेरे मन ये बता दे तू आहे पण जवानी की मस्ती मे चूर गायब झाला 😉
“छ्या! कधी कधी ही व्यावसायिक लोकं खूप त्रास देतात. चंदू आता पुढच्या महिन्यात सुटेल. अगदी माफक नवसागराचा वापर ही त्याची खासियत होती.”
हे फार आवडले!
खल्लास !!!!!
आता तरी सगळी रसग्रहणे थांबावीत !!
जियो !
– मिलिंद
रावशेठ,
सही विडंबन! हहपुवा…
तात्या.
Jabari!
🙂 मला पहिल्या काही ओळीन्मधे तुम्ही खरच या गाण्याबद्दल चांगलं लिहीत आहात की काय अशी भीती वाटलेली ….