लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

“लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला.
“भलतंसलतं म्हणजे?”
“म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे..”
“अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं…”
“कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस” तो धूर सोडत म्हणाला.
“फक्त सकाळमध्ये नाही. बर्‍याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय?
“काय त्याचं?”
“काय म्हणजे … त्यात लताबाई म्हणतात की.. म्हणजे एकीकडे म्हणतात की… की थोरले बर्मनदा मला वडिलांच्या ठिकाणी होते आणि दुसरीकडे म्हणतात की बर्मनदांनी एक गाणं पुन्हा रेकॉर्ड करायला पाहिजे म्हटल्यावर आमचे गैरसमज झाले आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोण माझ्याबरोबर काम करायला नकार देणारे. मीच तुमच्याबरोबर काम करत नाही ज्जा..”
“मग त्यात काय एवढं? तसं झालंसुद्धा असेल..”
“अरे मग नंतर ‘आता आर्डीला लाँच करायच्या वेळी आलात की नाही झकत पाय धरायला..’ हा माज कशाला?”
“माज? माज तुझ्या मते. माज? आम्ही याला स्वाभिमान म्हणतो. सेल्फ रिस्पेक्ट. एस्टीम. माज? ‘नुसती मराठी येता कामा नये, तो जन्माने मराठी असला पाहिजे’ असं परवा राजाभाऊ म्हणाले त्यालाही तू माजच म्हणशील. हा माज नव्हे. हा अभिमान. अस्मिता. हाच तो मराठी बाणा..”
“हां, हे चांगलं आहे. म्हणजे हा बाणा तुम्ही आपापल्यात भांडायला वापरणार म्हणा की.”
“बर्मनदा कुठे मराठी होते?” त्याने एक प्रश्नार्थक झुरका घेतला.
“च्च… अरे मराठी- अमराठी नाही रे. संगीताच्या क्षेत्राविषयी म्हणतोय मी. ‘तुम्ही असाल एवढे थोर, ज्येष्ठ संगीतकार वगैरे, पण शेवटी माझ्यासमोर झुकलातच की नाही’ हा तुझ्या मते बाणेदारपणा काय?’
“ऑफ कोर्स. आणि समजा असला माज तर असू दे. मी म्हणतो लताबाईंनी करावाच एवढा माज. तो शोभूनही दिसतो त्यांना. त्यांनी माज नाही करायचा तर काय अमरसिंगांनी करायचा?”
“हम्म. आता तू म्हणशील की आण्णा चितळकरांबाबत लताबाईंनी केलं तोही स्वाभिमानच. सेल्फ रिस्पेक्ट.”
“काय केलं आण्णांबाबत?”
“हेच की आण्णांचा कोणता तरी रेकॉर्डिस्ट होता. तो म्हणे लताबाईंबद्दल काहीतरी बोलला. लताबाई मग आण्णांना म्हणाल्या की त्याला काढून टाका, तरच मी गाणार. आण्णा म्हणाले की बाई, हा माझा जुना सहकारी आहे. त्याला काढून टाकणं काही मला जमणार नाही. मग लताबाई म्हणाल्या की… तेच रे!! II धॄII असं म्हणूया आपण फार तर. बाईंनी गायचं थांबवलं आण्णांबरोबर. मग ‘ऐ मेरे वतन के लोगों’ च्या वेळी आण्णा पाय धरायला आले आणि बाई फणकारुन म्हणाल्या की आणंच्याबरोबर गाणं? मी नाही ज्जा! दिल्लीला तालमी? मी नाही ज्जा! शेवटी गीतकार प्रदीप हात जोडून म्हणाले की बाई, तुम्ही हे गाणं गायलं नाही तर हे गाणं तसंच पडून राहील बरं का. मग बाईंनी आपला जरतारी पदर सावरला आणि एक समाजकल्याण खात्यासारखा निश्वास टाकून म्हणाल्या की बरं येते बाई. मग बाई दिल्लीला गेल्या, त्यांनी ते गाणं पंडीतजींसमोर म्हटलं आणि पंडीतजी….”
“पुरे, पुरे. II धॄII II धॄII II धॄII …. पण महाशय, हाही कणखर मर्‍हाटी बाणाच. अगदी आण्णाही मराठी असले म्हणून काय झालं? ते कितीही थोर संगीतकार असले म्हणून काय? ”
“खरं आहे. ‘मुझपे इल्जाम-ए-बेवफाई है, बेचैन नजर आणि तुम अपनी याद भी दिलसे मिटा जाते तो अच्छा था’ ही सगळी रत्नं त्यांनी एकाच सिनेमात दिलेली असली म्हणून काय झालं? ‘अनारकली’ ला लताबाईंचा आवाज त्यांनी अजरामर केला असला म्हणून काय झालं? आणि पंडीतजींसमोर जेंव्हा हे गाणं बाईंनी गायलं तेंव्हा संगीतकाराचा उल्लेख करायला दिलीपकुमार सोयीस्करपणे विसरला म्हणून काय झालं असंच ना??”
“गुरुवर्य,…” त्यानं शेवटचा झुरका घेऊन सिगारेट रक्षापात्रात विझवली. “कुजकटपणा नको. बोलायचा मुद्दे सुचले नाही की माणूस असा तिरक्यात शिरतो. आण्ण्णा माझेही आवडते. पण म्हणून त्यांनी काय लताबाईंबरोबर पंगा घ्यायचा?”
“पंगा… घाणेरडा पण अगदी बरोबर शब्द वापरलात महाराज. पंगा. शिवसेनट पंगा. म्हणजे आपल्याला पाहिजे ते झालं नाही की घ्यायचं वैर. वर्चस्व. वर्चस्व की लडाई. ‘सहर’ मध्ये अर्शद वारसीची आई झालेली सुहासिनी मुळ्ये सांगते तशी अनकंडीशनल पॉवर. आणि आम्ही पामर असं समजत होतो की कलेच्या पवित्र वगैरे क्षेत्रात असलं काही राजकारण असत नाही. असू नये. ‘मेरी तो सारी दुनिया घूम फिर के अनिलदाके पास आती है ‘ म्हणणारा तलत आणि ‘ ये तो तलतका बडप्पन है, मैं तो एक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं’ असं म्हणणारे अनिलदा हे आमचे आदर्श.’विद्येप्रमाणेच कलाही विनयानं शोभते असले आमचे बुरसटलेले समज. आम्हाला असली पंग्याची भाषा कशी कळणार, सरकार?”
“व्वा. शब्द अगदी शेणखतात बुडवून ठेवल्यासारखे कुजके वापरलेत साहेब. बट राईट. म्हणून तुमच्या तलतला सत्तरीनंतर एकही गाणं मिळालं नाही आणि अनिल विश्वास दिल्लीत मेला तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला दहा माणसंसुद्धा नव्हती. लताबाई बघ. आजही त्या जिथं पाऊल ठेवतील, लोग वहांकी मिट्टी चूमनेको तैयार है…”
“ओहोहो. आहाहा. एहेहे…. हे आमच्या ध्यानातच आलं नाही बृहस्पती. शेवटी तुम्ही याच फूटपट्टीनं मोजणार नाही का सगळं! रफीसारखा सरळ माणूस लताबाईंच्या या वर्चस्वाला आव्हान देतो तेंव्हा लताबाई हेच करतात, अं? काये ते तुमच्या भाषेत? हां, पंगा. सुमन कल्याणपूरला तुम्ही कुजवलंत का? या प्रश्नावर लताबाई म्हणतात की मी कुजवणारी कोण? संगीतकारच म्हणायचे की आमच्याकडं ओरिजीनल लता आहे, तर आम्ही लताची नक्कल कशाला घेऊ? पंगा. आशाचं काय म्हटल्यावर बाई म्हणणार की आशाचं काही नव्हतं हो इतकं, पण ते भोसलेसाहेब होते ना, ते फार दुष्ट होते. पण ते गेले बघा अकाली. अरेरे, फार वाईट झालं हो. पण त्यानंतर आता सग्गळं सुरळीत झालं आहे. पंगा, अं?”
“चष्मा बदला शहजादे, चष्मा बदला. तुम्हाला बासुंदीत मिठाची कणी टाकायची एवढी हौस असेल तर दुसरीकडे जा. लताबाईंविषयी असलं काहीबाही आम्ही तरी ऐकून घेणार नाही.” त्याने नवी सिगारेट पेटवली.
“तुम्ही असं बोलणार हे माहीतच होतं राजाधिराज. घाऊक प्रेम आणि घाऊक तिटकारा करणारे तुम्ही. तुम्हाला असली वस्तुनिष्ठता कशी पटणार? पण ध्यानात ठेवा आचार्य, एखादा ओंकारप्रसाद नय्यर निघतो. दशकातून एकदा निघतो, पण निघतो. आणि तो अशा माज करणार्‍यांना.. ओहो, चुकलो, अशा बाणेदारांना आपली जागा दाखवून देतो. ‘तू नही और सही, और नही और सही’ असं म्हणून जातो. पंगा घेणार्‍यांबरोबर तसाच पंगा घेतो…”
“ते मला काही माहिती नाही पण लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र पुन्हा म्हणाला.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

20 Responses to लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

  1. बाबासाहेब कहते हैं:

    घाऊक प्रेम आणि घाऊक तिटकारा करणारे तुम्ही. तुम्हाला असली वस्तुनिष्ठता कशी पटणार?

    हे शंभर टक्के पटले.

  2. Naniwadekar कहते हैं:

    Shri Sanjop Raav (or Rao) : I am amazed at the ignorance betrayed by some of the statements in your post.

    Asha Bhosle was going to sing ‘ai mere vatan ke logo’ (not logo.n, vocative plural is not nasalized in Hindi), and rehearsal was also conducted. Neither C Ramchandra nor Kavi Pradeep requested Lata to sing the song. Lata heard that there was a chance to sing in front of Nehru and the national audience at a moment when India was awash with patriotism, and she insisted that she would sing the song. C Ramchandra should have showed some spine but he melted and was fine with Lata’s proposal (perhaps hoping to rebuild bridges with Lata), but suggested that the song be sung as a duet. Lata wanted to hog the glory. It is an unprovable claim but she canceled Asha’s ticket to Delhi. CR had no choice but to conduct the next round of practice with just Lata.

    Secondly, Dilip Kumar did not omit CR’s name when Lata sang the song in front of Nehru. He did so during the Emergency during Indira Gandhi’s reign.

    More later.

    – Naniwadekar

    • sanjopraav कहते हैं:

      Dear Mr. Naniwadekar, The statements made in my article (?) are based on an interview of Lata Mangeshkar by Amin Sayani. These two parts are available (and downloadable) on internet. Dilip Kumar did not omit CR’s name when Lata sang the song in front of Nehru. He did so during the Emergency during Indira Gandhi’s reign This is possible. Blame it on my weak memory. Anyway, the article (? again!) is not (supposed to be) about Lata and tehrefore, in a hurry to correct the technical details, I am afraid ,you are missing the whole point.Talat, anil Biswas (Bakwas?) are only the tools to prove a completely different point. So, though you may be very correct, that is unimportant. Thanks however, for reading my blog and commenting on it Regards. Sanjoopraav

  3. नानिवडेकर कहते हैं:

    श्री सन्जोप राव : ‘कवि प्रदीप यांनी लताला ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची विनंती केली’ हे विधान तुम्ही लताची टर उडवायला केलं असावं हे मला सकाळी घाईत वाचताना लक्षात आलं नाही. लताला हे गाणं गायची संधी देण्याचा प्रदीप यांनी प्रयत्न केला असल्यास मला माहीत नाही.

    दिलीप कुमारनी त्या गाण्यासंबंधात सी रामचंद्रांचा उल्लेख टाळला त्या प्रसंगाचा नेहरुंशी संबंध नाही, याचा मी उल्लेख केलाच आहे.

    आता शेवटी अनिल बिस्वासचा तथाकथित विनयशील स्वभाव. हा अनेकांचा गोड गैरसमज़ आहे; मी ही त्यातलाच एक होतो. पण अनिल बिस्वासनी संशय वाटावा असे बरेच दावे केले आहेत. शिवाय दादांना स्वत:विषयी बोलत बसायची सवय होती. ‘तुमचं नाव ‘अनिल बिस्वास’ ऐवजी ‘अनिल बकवास’ असायला हवं होतं’ असं मीना कपूर त्यांना कधी कधी गंमतीनी म्हणत. आणि तलत दादांविषयी खूप आदरानी बोलत असला तरी त्यानी अनिलदांसाठी १४-१५ गाणीच गायली आहेत. आरज़ूत एक, दो राहा मधे ३, तराना ३, वारिस ४, जासूस एक, आराम एक. दोन गैर फ़िल्मी, ‘फिर प्यार किया’ आणि अज़ून एक आठवत नाही.

    – डी एन

  4. Naniwadekar कहते हैं:

    Since your post deals with Lata from the first sentence to the last sentence, with a few references to Shiv Sena thrown in, I am still finding it difficult to treat Lata as an incidental tool used to make a point about the current political dispute about Marathi pride. If that was the main point, I would have expected Lata to be one of the examples used to make a wider point. Let that be.

    It is easy for anybody to forget the exact occasion when Dilip Kumar failed to mention C Ramchandra’s name while talking about ‘ai mere vatan ke logo’. I should not have called it ‘unpardonable ignorance’. That was overreaction on my part, but it was partially caused by the undeserved (IMO) praise heaped by you on Anil Biswas. But I shall grant that several other followers of film music also have this false image of Anil Biswas as a very humble man. Genius he was, humble he wasn’t. But I can also understand his frustration that he remained unknown while people like Naushad and S D Burman, who did not have even 50% of his genius, enjoyed huge popularity.

    – dn

    • sanjopraav कहते हैं:

      I admire your comment for several reasons. You have been so uninhibited and candid, which is a rarity even in the virtual world. The comment is extremely well worded, which has been a cause of my envy. English, like an unhappy mistress, has been eluding me all my life. I find it extremely embarrassing to explain the real motive behind my writing. Probably you may care to visit http://www.misalpav.com where some of the comments have nearly hit the target. The mention of Shivsena (and even MNS) can only be attributed to my personal feeling of helplessness that I have not been to keep away from my writing. Thanks again. Sanjeev

  5. आरती कहते हैं:

    बापरे! काय हा माहितीचा आवाका! लोक एव्हढी माहिती कशीच काय लक्षात ठेवू शकतात म्हणते मी! आणि लताबद्दल बोलाल तर मी तुमच्या त्या मित्रा सारखीच आहे…
    पण एक खरं…की इतकं पद्धतशीर ’मार्केटींग’ आजही कुणाला जमत नाही….कित्येक मधुरा दातार, बेला शेंडे अशा गुणी गायीका इतकं नाव आणि प्रसिद्धी नाहीच कमवू शकत!

    • sanjopraav कहते हैं:

      अहो, त्यात काय एवढं! इंटरनेट्वर हे सगळं अगदी त्यातल्या चमचमीत तपशीलांसकट उपलब्ध असतं. म्हणजे चिकन अगदी मॆरिनेट करुन तयार असल्यासारखं. लेखकाचं काम फक्त ते फोडणीला टाकण्याचं! कांदा, टोमॆटो, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि शेवटी मीठ! की झालं तयार!

  6. Naniwadekar कहते हैं:

    संजीव-राव : तुम्ही तर उत्तम इंग्रजी लिहिता. त्याबाबत तुम्हाला लाजिरवाणं (embarrassing) वगैरे का वाटावं? माझ्या मते ती काही आपली भाषा नाही, आणि ती आली नाही तरी त्यात हरकत नाही. मी मराठीपेक्षा इंग्रजी जास्त वाचतो; मला इंग्रजी भाषा खूप म्हणजे अगदी वेड लावेल इतकी आवडते; इंग्रजीत ज़मेल तसं लिहायलाही आवडतं; पण तरीही माझी भाषा ही मराठीच.

    मिसळपाव वरच्या चर्चेवरून लेख लतावरच असावा. तात्या अभ्यंकरांना लता आवडते, असा उल्लेख वाचला. त्यांना ती काय आवडत असेल इतकी ती मला आवडते. पण कलाकार म्हणून. व्यक्ती म्हणून सगळा आनंदच आहे. तरीही एक वाटतं, ते म्हणजे ही अशक्य सुन्दर गाणारी, आर्थिक चणचण असलेली, सडपातळ, दुबळी दिसणारी लहान मुलगी त्या सगळ्या चारित्र्यशून्य सिनेमावाल्यांच्या कळपात पोचली. ते काय हिच्याशी धड वागले असतील? नंतर बाईनी त्यांना व्यवस्थित लाथा हाणल्या. छान केलं.

    मिसळपावच्या पहिल्या पानावर आज़ लता का, हे मात्र कळलं नाही. आणि ज्या चर्चेत ७०-८० टक्के लोक टोपणनाव घेऊन इतरांवर मुक्तकंठे टीका करतात त्या धैर्यधरांच्या मेळाव्याबाबत मला तुच्छता वाटते. एखाददुसरं टोपणनाव मी समज़ू शकतो. तुम्ही नक्की काय धाडस करता आहात, की KGB, CBI, CIA हे सगळे तुमच्या मागे लागतील? सावित्रीबाई फुले १८६०-१८७० कडे विधवा गर्भार बायांना समाज़ाचा रोष पत्करून उघडपणे गर्भपातासाठी मदत करायच्या म्हणून सद्‌गदित व्हायचं, आणि आपलं नाव लपवायचं. काय अर्थ आहे? ‘कवटी’, ‘पुण्याचे पेशवे’, ते खाली ‘मुक्तसुनीत’ हे शूर शेंदाड शिपाई आहेत तरी कोण? सगळाच आनन्द आहे. ते असो.

    माझा मुख्य मुद्‌दा म्हणजे अनिल बिस्वास समज़ल्या ज़ातो तितका नम्र माणूस नव्हता.

    – डी एन

    • sanjopraav कहते हैं:

      डी एन, सावित्रीबाई फुल्यांचे उदाहरण पटले. आवडले. गौरी देशपांडे हे (मला न आवडणाया) लेखिकेचे दुसरे. त्या उघडपणे दारु प्यायच्या. फलटणचा दुकानदार दारुची बाटली काळ्या पिशवीत घालून द्यायला लागला की “मला प्यायला वाटत नाही तर तुम्हाला विकायला लाज का वाटते?” असे विचारणारी ही बिनधास्त बाई. प्रश्न मिसळपाववरच्या अनामिक सदस्यांचा. तर ते तसेच आहे. मिसळपाव, उपक्रम, मनोगत, मायबोली अशा सगळ्या ठिकाणी हाच प्रकार आहे. मिसळपावच्या आजच्या पानावर लता हे सुमारसद्दीचेच लक्षण आहे. ते सोडून देऊ. अनिल बिस्वासविषयी बाकी आणखी जाणून घ्यायला आवडेल. व्यक्ती म्हणून अनिलदा कुठे बेसूर झाले असतील तर तिथे ‘तू, तुझा बाप’ असा रोखठोक पवित्रा घ्यायला मी तयार आहे. आता आणखीही एक सांगतो, माझ्या मूळ लिखाणाचा विषय हाच आहे. आता आभार वगैरे काही लिहीत नाही. संजीव

  7. Naniwadekar कहते हैं:

    Come to think of it, Anil Biswas did not make very many egregious boastful claims, like Naushad (who boasted that Saigal wanted ‘jab dil hii TuuT gayaa’ played during his funeral, only for the claim to be rubbished by Saigal’s daughter), but Anil-da’s tendency to make questionable claims is evident in several cases which, taken together, present a less than wholesome picture about Anil Biswas’ modest nature. My own direct interaction with Anil Biswas was limited to 5 minutes spent together during a programme in Pune around early January 2002 and a few telephone calls. Plus I tried to get inputs from his daughter, Shikha Vohra, who was an e-friend for a while after Dada’s death before we lost touch, and from Shri Pravin Junnarkar of Baroda, whom Dada regarded like his son. Some of the information was told in confidence, so I will avoid mentioning it here.

    Anil Biswas had claimed to Shri Junnarkar that he had composed ‘seene me.n sulagate’ as a solo for Talat but Lata requested that she be given a few lines in the song, too. I asked him for more details, but he changed his story and said it was always meant as a duet and ‘nobody could tell me to change a solo into a duet’. So he tended to float whichever story suited his passing fancy.

    Going a little backwards to Arzoo (1950), he claimed that Roshan had tears in his eyes when he heard ‘kahaa.N tak ham uThaaye Gam’. Where is the proof of this? I admit that such a thing could have happened, but more likely he was frustrated that this gem, surely among the very greatest songs Lata has ever sung, remained unknown and wanted to make it a topic of discussion.

    Anil Biswas gave a series of interviews to Tushar Bhatia which are broadcast by Vividh Bharati periodically and in which he had talked about various composers. I have heard that he did this because he was offered good money to do these talks (and that is okay), but in private he used to make condescending remarks about his fellow composers. (‘He (S D Burman) was a junior when I was a star with Bombay Talkies.’) That is not false but is indicative of his ego, and also perhaps jealousy that SDB became more popular than him.

    He claimed that the songs in Basant (1942) were composed by him. This is not impossible and, to be fair to him, he made the claim when several people associated with Basant might have been around to verify/refute the claim. Still, why would Pannalal Ghosh, himself an accomplished tunesmith, though not quite as good as Anil-da, need Anilda’s help? I am sceptical. I do not think that Pannalal could have composed gems like ‘wo dil me.n ghar kiye the’ and ‘suukhii bagiyaa harii huii’ (both from AB’s Hamaarii Baat), but music in Basant is comparatively less exalted and Pannalal could have composed it. Did Anil Biswas stake his claim to tunes in Basant which were actually Pannalal’s because it is one of the great films, musically? I think it is possible. Flute-player Murdeshwar, Parul Ghosh’s grandson, may know something about it.

    Anil Biswas claimed that he was planning to make Mukesh sing ‘saanjh bhayii banjaare’ in Aasra (1941). This is yet another feel-good balloon floated by Dada, I suspect. This song was available in 1955-1960 period with collectors in Hyderabad but that was before I was even born, and I have not succeeded so far in getting the song, which is in Dada’s own voice.

    He claims that two songs in Manmohan (1936) were composed by him. Naushad confirms this claim, so I am fine with it. Of the two, I have heard ‘tumhhee ne mujh ko prem sikhaayaa’, and it is indeed a beautiful song.

    Then there is the case of Mukesh’s first film song: ‘dil hii bujhaa huaa hai to fasle bahaar kyaa’ from Nirdosh (1941). Anil-da once claimed that it was actually his composition. I don’t think this claim has been widely accepted and I will have to check with Hamraaz why the claim has not been accepted. But yet again, we find AB weaving a story which isn’t quite credible. He says that Ashok Ghosh, the film’s composer, was nervous before the song was recorded. Why should he have been nervous? He had been composing songs at least since 1936 and must have been older than AB. AB certainly gets credit for composing thrillingly beautiful songs for a stellar singer like Wahidan (Nimmi’s mother). But Ashok Ghosh had also made great use of Wahidan’s voice in Sanskaar (1940). He, too, knew how to compose songs for a voice which had severe limitations, like Wahidan’s sister ‘Jyoti’. Why would Ashok Ghosh be nervous before recording Mukesh’s first song? मैंने कहाँ, ‘तुम क्यूँ नर्व्हस हो रहे हो’? Riiight. AB alone could be confident in such a setting.

    As I said, individually, most of these claims sound feasible. But taken together, picture emerges (at least, to my eye) of a man who was bitter and trying to attract attention to himself.

    The story that he once condescendingly called Sajjad, his junior by 4-5 years, ‘Beta’ was mentioned by Shirish Kanekar after Sajjad’s death in 1995. Sajjad took offence, and I daresay he was correct. I find Sajjad overrated as composer, but when someone tried to soothe Sajjad’s ruffled feelings by pointing out that AB was senior to him by a few years, Sajjad had a point when he retorted : Was he producing babies when he was 5-6 years old?

    – dn

    • sanjopraav कहते हैं:

      Great stuff, this. I am speechless. And I thought I knew something about Hindi Filmi music!

      • Naniwadekar कहते हैं:

        > And I thought I knew something about Hindi Filmi music!
        >

        तुम्हाला कुठल्या काळच्या संगीतात रस आहे यावर ते अवलंबून आहे. आर डी बर्मनच्या गाण्यांविषयी प्रचंड माहिती असलेले लोक आहेत, आणि मला कळत नाही की जी गाणी मी १० सेकंदही सहन करू शकत नाही, त्या गाण्यांत लोक इतका रस कसा घेतात?

        मला रायचंद बोराल, अनिल बिस्वास, खेमचंद हे संगीतकार आवडतात. पाचव्या दशकातलं ज़वळज़वळ सर्वच संगीत मला आवडतं, आणि सहाव्या दशकातलं १९५५ पर्यंतचं; ते ही मुख्य म्हणजे लतामुळे. आपल्याला ज़ुनं संगीत आवडतं, हा भारतीयांना स्वत:विषयी असलेल्या अनेक गोड गैरसमज़ांपैकी एक मोठा समज़. हे लोक मला आक्रमक वाटणारी गाणीही ऐकू शकत नाहीत, आणि ती रटाळ ठरवून ढेपाळतात. http://films.hindi-movies-songs.com/index-listen.html इथे अनेक ज़ुनी गाणी मिळतील. तुम्हाला ही साईट माहीत असणारच.

        मी दहा वर्षांपूर्वी १९३१-४० चा फ़िल्म कोश घेतला. मला त्या काळाची माहिती आहे, असा माझा समज़ होता. पण ‘मैं बन की चिडिया’ या गाण्यापलिकडे मला फार माहिती नव्हती, तेव्हा माझं मलाच हसू आलं. पण कमलाकर पसुपुलेटींसारखे मित्र मला इंटरनेटवर भेटले, आणि मला ज़ुनी गाणी फार आवडू लागली. अनिलदाच्या ‘जागीरदार’, ‘अलीबाबा’, औरत, बसन्त, रोटी, हमारी बात, ज्वार-भाटा, पहली नज़र, मिलन, वीणा, किंवा खेमचंदचा तानसेन, भर्तृहरी, सिंदूर, ज्ञान दत्तचा ‘शंकर पार्वती’, शंकरराव व्यासांचा राम राज्य, श्यामसुंदरचा भाईजान अशा अनेक सिनेमांतली गाणी तुम्हाला मिळू शकतील. माझ्या मते हे सगळंच संगीत अत्युच्च दर्जाचं आहे.

        यातला एक तोटा म्हणजे या द्‌वारे होणारे मित्र म्हातारे असतात, आणि माझे हे मित्र धडाधड मरताहेत. पण त्याला इलाज़ नाही. पेशावरचे अल्लाहदाद खान – २००४ मधे वारले. बड़ोद्याचे प्रवीण जुन्नरकर – २००७ मधे ७१-व्या वर्षी वर गेले. फिलाडेल्फियातले सतीश कालरा – २००७ मधे जेमतेम ६५ चे असताना गेले. ‘गीतयात्री’ सारखं सुंदर पुस्तक लिहिणारे मोहोळकर १९९४ मधेच गेले. त्यांना तर कधी भेटताही आलं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातलं संगीत हे काही वर्षातच नष्ट होणार. पण त्यालाही इलाज़ दिसत नाही. ते टिकवून ठेवण्याची धडपड सुरजित सिंह यांच्यासारखे लोक करताहेत, ही एक त्यातल्या त्यात आशेची आणि समाधानाची बाब आहे.

        – डी एन

  8. Nandan कहते हैं:

    वा! श्री. नानिवडेकर आणि तुमचा संवाद वाचून फार छान वाटलं.

  9. शुचि कहते हैं:

    मला हा लेख खूप आवडला ….. (१) आपली “मी आणि तो” लेखनशैली लाजवाब (२) चित्रदर्शी वर्णन उदा. – धूर सोडत माझा मित्र म्हणाला वगैरे (३) कथा-नायक हा आदर्शवादी आहे ….. जशी मी आहे त्यामुळे चटदिशी या लेखाशी नातं जुळू शकलं.

    बाकी लताबाई वगैरे माहीत नाही ना करून घेण्याची फार गरज वाटते.

  10. बाबुराव देसाई कहते हैं:

    सडेतोड……….

    ही प्रतिक्रिया या लेखासाठी होती, चुकुन हणम्यावर आदळली

  11. बाबुराव देसाई कहते हैं:

    आणि प्रत्येक चांगला कलाकार हा चांगला माणुस असेलच ह्याची खात्री देता येत नाही तसेच त्याचा आग्रहही धरता येत नाही. कार्यक्षमता अथवा प्रतिभा आणि नैतिकता ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
    गाणं, संगीत, कला , चित्रपट वगैरे ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेत. प्रत्येकाची आवड निराळी असु शकते . लेखाची मांडण्याची मला पद्धत आवडली. (चांगली की वाईट हे ठरवू शकत नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे ते व्यक्तिसापेक्ष आहे)

    आपल्या नव्या लेखनाच्या प्रतीक्षेत……..

  12. पिंगबैक: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा

  13. पिंगबैक: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s