Author Archives: sanjopraav

माझे खाद्य-पेय जीवन-१

‘गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट’ हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

समजत नाही… समजत नाही…

“म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. ” अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी  इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या  मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 8 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए – समारोप

दुःख, हळवेपणा आणि जी ए ‘धुक्यातून उलगडणारे जी ए’ ही लेखमालिका लिहिताना एक लेखक आणि त्याहीपलीकडचा एक माणूस म्हणून जी. ए. कुलकर्णींचा शोध घ्यावा असे मनात होते. आता या लेखाद्वारे ही मालिका संपवताना त्यातले फारसे काही हाती लागले नाही, अशी … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां

नफरत करनेवालोंके..

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही अविस्मरणीय विनोदी नटांमध्ये माननीय श्री. देवानंदजी यांचे नाव घ्यावे लागेल. कारकिर्दीच्या पूर्वार्धातील त्यांचा तो केसांचा कोंबडा, त्यांची ती पक्षाघात झालेल्या तरसासारखी चाल, संधीवातावर उपचार म्हणून व्यायाम घ्यावेत तशी ती त्यांच्या सांध्यांची हालचाल वगैरे. ‘पाकिटमार’ मधल्या ‘ये … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

आयुर्वेद उवाच

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्याविषयी आम्ही अपार आदर बाळगून आहोत. एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या ‘सकाळ’ समूहाच्या मोहिमेत आयुर्वेदाचे कार्पोरेटायझेशन करून डॉ. तांबे यांनी आपला जो खारीचा वाटा उचलला आहे तो केवळ ‘काबिले तारीफ’ आहे असे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 10 टिप्पणियां

मैफल

आण्णांनी तळव्यावरची तंबाखू नीट मळून घेतली. दोन-तीनदा ती या हातातून त्या हातात अशी केली. आणि मग तिचा एक तबीयतदार बार भरला. हात झटकून टाकत ते म्हणाले, “ऐका बांडुंगअली… ” गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांनी हातातल्या सिग्रेटवरची राख झटकली. ते थोडेसे पुढे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके – प्रकाशवाटा

प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

खरं काय आणि खोटं काय

“दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू” गौतम म्हणाला. ” ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके – मिरासदारी

द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो ‘टंग इन चीक’ च्या … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

माझ्या संग्रहातील पुस्तके – ७ कुसुमगुंजा

जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तक. या पुस्तकाची रचना व त्याचे नाव जी.एंनी आपल्या हयातीत ठरवले होते, मात्र या पुस्तकावर शेवटचा हात फिरवण्याइतका वेळ बाकी त्यांना मिळाला नाही. जी.एं च्या ‘माणसे – अरभाट … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे