Monthly Archives: सितम्बर 2006

चित्रगुप्त नावाचा संगीतकार

पुण्याचे डॉ. प्रकाश कामत हा एक वेडा माणूस आहे. त्यांचे हे वेड आहे जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे. त्यांच्या ‘सूरविहार’ या स‌ंस्थेतर्फे संगीतकार चित्रगुप्त यांच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गेल्या महिन्यात सादर झाला. विभावरी आपटे-जोशी, योगिता गोडबोले-पाठक, अपूर्वा गज्जाला या गायिका आणि … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

नारायण धारप – अमानवी अज्ञाताचा आलेख – १

‘रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते. मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं ……’ जगातली सर्वात छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे.  इंग्रजी साहित्यात भयकथा, … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

जी.एं. च्या कथांमधील नियतीवाद

चित्रकार सुभाष अवचट हे जी.एं. चे (त्यातल्या त्यात ) मित्र. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण जी.एं. ना पाठवले. जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता. जी.एं. नी अवचटांना जे उत्तर पाठवले त्यात म्हटले आहे ‘आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

‘दिल जो न कह सका’- संपन्न संगीतानुभव

संगीतकार अनिल विश्वास यांच्या ‘माधुर्य’ परंपरेतील ( ‘मेलडी’ स्कूल ) एक प्रमुख शागिर्द संगीतकार रोशन यांच्या हिंदी चित्रपटगीतांवर आधारित ‘दिल जो न कह सका’ हा कार्यक्रम काल रात्री पुण्यात झाला. उपजत गुणवत्ता, वाद्यांवरची हुकुमत, शास्त्रीय संगीताची तयारी, अर्थपूर्ण काव्य देणारे शायर आणि … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

काळ्या चष्म्याआडचा माणूस

‘आजारी माणसांना किंवा आजाराची शंका असणाऱ्यांना औषध घेण्यापासून परावृत्त करणे हे डॉक्टरचे एक महत्वाचे काम आहे’ या अर्थाचे वरकरणी विरोधी भासणारे एक इंग्रजी वचन आहे. यश आणि यशातून मिळणारी प्रसिद्धी याबाबतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेवढी तपश्चर्या … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 21 टिप्पणियां

‘पाडस’ आणि ‘हरीणबालक’

मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेची ‘द इयर्लिंग’ ही कादंबरी जागतिक साहीत्यविश्वात महत्वाची मानली जाते. १९३८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळेच, अपरिचित रूप रेखाटले आहे. या कादंबरीचा काळ शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा. जंगलात एकटे रहाणारे बॅक्स्टर कुटुंब. … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

कृतार्थ…

डिस्क्लेमरः खालील मजकूर म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही. माझ्या काही शंकेखोर मित्रांच्या मते ती चोरून केलेली कविताच आहे. माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे ‘माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

रात्र झाली गोकुळी

‘कारट्या, किती भूक भूक करशील…’ घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

जीएकथांमधले भाषासौंदर्य -१

जी. एं. वरील माझ्या याआधीच्या लेखानंतर जी.एं. चे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर का गेले नाही असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. मला वाटते जी.एं. ची विलक्षण शब्दकळा हेसुद्धा त्यामागचे एक कारण असावे. जी.एं. ची पात्रे जितकी अस्सल मराठी मातीतली आहेत, तितकीच … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

वर्तुळ

हातातला डबा मी हळुवारपणे पाण्यात सोडला. कृष्णेच्या पाण्यात राख आणि अस्थींचा एक लहानसा पांढरा ठिपका उमटला. निश्चल नजरेनं मी समोर पहात राहिलो. बघता बघता समोरच्या देखाव्याचा तुकड्यातुकड्यांचा कॅलिडोस्कोप झाला. काळेपांढरे, रंगीबेरंगी तुकडे एकमेकात मिसळून थरथरत, तरंगत राहिले‍. जराशानं त्याचा एकच … पढना जारी रखे

Akka, Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां