पहिला दिवस-1

भांडाभांड विद्यापीठाशी संलग्न ‘मनोगत वादविवाद आणि भांडणकला महाविद्यालय’ चा आजचा पहिला दिवस.

आपल्याला पहिल्याच दिवशी उशीर झाला की काय या काळजीने घाबराघुबरा झालेला सर्किट कोपऱ्यावरुन घाईघाईने वळाला तसे शामियान्यातून येणारे भीमसेनअण्णांच्या मारव्याचे सूर त्याच्या कानावर पडले. सर्किटच्या भव्य कपाळावरच्या आठ्यांत एकीची भर पडली.”आता या नोकरीत काय आपल्याला अण्णा आणि बाबुजीच ऐकत रहायला लागणार वाटतं!’ तो स्वतःशीच म्हणाला ‘या’चंद्रा’चा कलेकलेने वाढणारा लहरीपणा आपल्याला सहन करायला लागणार तर!’ . व्वा! अचानकच जमून गेलेल्या कोटीनं त्याच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते एक दुर्मिळ हास्य उमटलं. तरीही अमेरिकेतली उत्तम नोकरी सोडून भारतात मास्तरकी करण्याचा निर्णय घेऊन आपण चूक तर केली नाही ना, ही शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शामियान्यात मारवा गुंजत होता खरा, पण एकंदरीत आसपास शुकशुकाटच होता. मंडपाबाहेर चित्त, सन्जोप राव आणि माधव कुळकर्णी सिगरेट ओढत उभे होते. शेजारी दोन खुर्च्या टाकून दिगम्भा आणि अत्त्यानंद गप्पा मारत होते.
“काय रे, नऊची वेळ होती ना? मला वाटलं की मलाच उशीर झालाय…’ सर्किट म्हणाला.
“अरे, तात्याच्या महाविद्यालयाचा कार्यक्रम!” माधव म्हणाला ” सकाळी नऊचा रात्री नऊला सुरु झाला तरी नशीब. तशी सत्यनारायणाची पूजा सुरु झालीय आत, पण हा सन्जोप म्हणाला की साधुवाण्याचं नाव ऐकलं की म्हणे त्याचं ब्लडप्रेशर वाढतं. मग म्हटलं चला बुवा, एकेक सिग्रेट मारून येऊ…”
“नमस्कार, मी अत्त्यानंद” बुवा नम्रपणे उठून उभे राहिले.
“नमस्कार, मी सर्किट”
“हो, ओळखलं मी तुम्हाला” बुवा अधिकच नम्र झाले. “विद्वत्तेचं तेज कुठे लपून रहातं का? मी तुमचा निस्सीम चाहता आहे. तुम्ही लिहायचं थांबवलंत, वाईट वाटलं मला. अहो, कुणी कसं वागो, आपण आपलं सत्कृत्य करत रहावं, नाही का? आता माझ्यासारखा य:कश्चित माणूस लिहीत रहातो..”
“हो, तुमचे ‘रम्य दिवस’ वाचतो मी, आवडतात मला…”
“कसचं कसचं… आपण लेखनसम्राट, मी आपला पांढऱ्यावर काळं करणारा…”
बुवा याच थाटात बोलत राहिले असते पण दरम्यान चित्तची सिग्रेट संपली होती. “चला आत जाऊ या” तो एकदम म्हणाला. मंडळी आत जायला निघाली
“काय रे सन्जोप..” माधव आणि सन्जोप मागे रेंगाळले होते
“काय?”
“नाही, तो अत्यानंद मगाशी सर्किटला जे म्हणत होता..”
“त्याचं काय?”
“मला वाटतं, आतल्या सगळ्या मंडळींना एकेकटं गाठून तो तेच म्हणत होता.. असं मला वाटतंय हं..”
“माधवा, तुझ्या शंका फार हं. जाऊ दे ना, एखाद्याला वाटतं, सगळ्यांना चांगलं म्हणावं…”
“अरे, पण त्याने हा रोल घेतला तर वेदश्री काय करणार?”
सन्जोप ठोठो हसला.एवढ्यात काळा टी शर्ट घातलेला कुणीतरी घाईघाईने आत जाताना दिसला. “ओळखलंस का याला?” दिगम्भाने चित्तला विचारले. “चेहरा तरी ओळखीचा वाटतोय बुवा..” चित्त म्हणाला “अरे हो, मगाशीच हा घाईघाईने मंडपाच्या बाहेर जाताना दिसला होता, पण त्या वेळी तर त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता मला वाटतं…” 
“बरोबर” दिगंभाने खुलासा केला. “तर पांढरा शर्ट घातला असेल तेंव्हा त्याला अनिरुद्ध १९६९म्हणायचं, आणि काळा शर्ट असेल तेंव्हा…?”
“केशवसुमार!” सन्जोप, माधव आणि सर्किट एका सुरात म्हणाले 
“करेक्ट” दिगंभा म्हणाला. “पण हा अशी धावपळ का करतोय बुवा?”
“काही नाही रे…” माधवने खुलासा केला. “त्याला आत एखादी नवीन कविता सापडली असणार, आणि इतर कुणाला कळायच्या आत तिचं विडंबन करायचं असेल त्याला. म्हणून ही सगळी धावपळ.”
मंडपाच्या आत सत्यनारायणाची पूजा रंगात आली होती. महाविद्यालयाचे प्रणेते तातोबा जातीने पूजेला बसले होते. त्यांच्या गुटगुटीत तनूवर सोन्याचा गोफ शोभून दिसत होता. हाताच्या बोटातल्या जाडजूड अंगठ्या चमकत होत्या. एखाद्या सापाने बेडकाला गिळण्याऐवजी बेडकानेच सापाला गिळले तर त्याच्या मुद्रेवर जसा तृप्त,शांत भाव येईल तसा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ! पूजा सांगणारे गुरुजी मात्र समारंभाला अगदीच विशोभित होते. किडकिडीत शरीरयष्टी, वाढलेली दाढी, किडके दात आणि चिरकटलेला आवाज. “या तात्याला महाविद्यालयाच्या उद्घाटनाला एक चांगला गुरुजी पण मिळू नये का?” मिलिंद फणसेने सर्वसाक्षीला विचारले. “अरे मिलिंद, तू यांना ओळखलं नाहीस का? हे शिंत्रे गुरुजी! म्हणजे तात्याचं वशिल्याचं तट्टू!” टग्याने परस्पर उत्तर दिले.”कंपूबाजी नाही तर समारंभ कसला? खि..खि…खि….” टग्याचे हसणे बाकी अगदी तस्से राहिले आहे!
“जेवणाची काही व्यवस्था आहे की नुसताच तीर्थ प्रसाद?” माधवने जयंताला विचारले. सिगारेटच्या वासाने अस्वस्थ झालेला जयंता पूजेला बसलेल्या तात्याजवळ गेला. “तात्या, असल्या शुभ कार्यात तरी तुझ्या प्राध्यापकांना व्यसनांपासून दूर रहायला सांग. अरे, शरीरसंपदा महत्त्वाची. विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार हे लोक…? जयंता भावनाविवश झाला होता.
“पंग ट्यांचं ट्यांना कयाया णको का?” तात्याने मुखरस सांभाळत पहिल्यांदा तोंड उघडले. त्या किमामी जर्द्याच्या खुश्बोयुक्त प्रश्नाने जयंता खचल्यासारखा झाला. “आता काय बोलणार? इथे साक्षात महाविद्यालयाचे प्रणेतेच एकसोबीस तीनसो लावून पूजेला बसलेत! आता तक्रार तरी कुणाजवळ करायची?” जयंता स्वतःशीच म्हणाला. 
अखेरीस पूजा आटोपली. सध्या तरी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक वाटत होती. तीन विद्यार्थी बाकी कपाळाला गंधबिंध लावून मनोभावे हात जोडून उभे होते. तीघांच्याही हातातल्या वहीवर शारीरिक बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करून वस्त्रप्रावरणांचाही बहुतेक संपूर्ण त्याग केलेल्या एकेका स्वामींचे उन्मनिय असस्थेतले फोटो लावलेले होते. त्यावरून ते सचिन म्हेत्रे, नितीन व नाम्या असावेत अशी शंका बऱ्याच प्राध्यापकांना आली.
“राम राम मंडळी. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो” प्रणेते बोलायला उठले. “सगळं काही जमलं आहे, पण च्यायला महाविद्यालयाला समर्पक असं बोधवाक्य काही सापडलं नाही. आता आपल्याकडे इतकी विद्वान मंडळी आहेत, तेंव्हा तुमच्याकडूनच काही सूचना आल्या तर बघू. काय जयंता, काही सुचतंय का?”
“मला वाटतं ‘सत्यं शिवं सुंदरम’ हे समर्पक ठरेल” जयन्ता.
“पण या महाविद्यालयाचा आणि सत्याचा काय संबंध? एकलव्याने शंका काढली.
“‘हान तिच्या आयला’ पटतंय का बगा समद्यास्नी” खेडूत.
“यात न पटण्यासारखे काही नाही, पण सगळ्यांची संमती असल्यास माझा विरोध आहे” जीवन जिज्ञासा.
“जीजि, तुझ्या या विधानाला माझा विरोध आहे” सर्किट
“मला वाटते…” मुक्तसुनिताने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आतापर्यंत तो एका पुस्तकात डोके खुपसून बसला होता. “मला वाटते, ‘भविष्यसरणावरचे अर्धवर्तमानबाष्प पेटवूया’ हे रास्त ठरेल”
“आणि हा काय शिकवणार म्हणे? मराठी? खि…खि…खि…” सन्जोपच्या कानात टग्या.
“थांबा, थांबा…” चित्त पुढे सरसावला. “मनोगतच्या वैचारिक पार्श्वभूमीला अनुषंगून मी असं सुचवतो की
‘अलहक कि तिरी वसअते तखईल के आगे
सहरा कफे खाकस्तर व गुलशन कफसे रंग’
हे बोधवाक्य ठेवूया….”
आता यातले एक अक्षरही कुणाला न कळाल्यामुळे चित्तचा ठराव सर्वसहमतीने मंजूर होणार अशी चिन्हे दिसत असतानाच कुणाचा तरी भ्रमणध्वनी खणखणला. मुळात प्राचार्य म्हणून निवड झालेले पण  नंतर फक्त ज्ञानेश्वरी या विषयासाठीचा अर्धवेळ प्राध्यापक विनायक बोलत होता. प्रणेतांचे आणि त्याचे काय बोलणे झाले कुणास ठाऊक, पण प्रणेत्यांनी अचानक ‘मौनं सर्वार्थ साधनं’ हे बोधवाक्य ठरले असल्याचे जाहीरच करून टाकले.
पहिला दिवस, त्यामुळे प्राध्यापकांच्या ‘आपापसात’ ओळखी करून देण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
“मी दिगम्भा. मी शास्त्रीय संगीत आणि हिंदी चित्रपटसमीक्षा हे विषय शिकवतो”
“आणि त्याचा अर्धवेळ सहायक म्हणून इतर कुठल्याच विषयात गती नसलेला सन्जोप काम करेल” प्रणेते रोखठोक शब्दात.
“म्हणजे दिगम्भाने लिहायचे, आणि सन्जोपने त्याचा त्याचा अर्थ मराठीत सांगायचा….” माधव कुळकर्णीला हे चांगले जमते!
“मी नरेंद्र गोळे. मी हिंदी चित्रपटगीतांचा मराठीत अनुवाद करतो…”
“का?”
“का म्हणजे? लोकांना चांगल्या हिंदी गाण्यांचा अर्थ नको कळायला? आता नुकताच मी एक अनुवाद केला आहे” गोळे जरा चालीत गायलाच लागले
“धोका धोका…
धोका धोका वई वई वई
धोका धोका वई वई वई
झाली रे झाली
मला झाली रे झाली…”
“वा, वा, काय गाणं आहे की त्रिफळा चूर्णाची जाहिरात? खि..खि…खि…” टग्याच तो! त्याचं तोंड कोण धरणार?
तेवढ्यात छुन छुन छुन असा पैंजणाचा आवाज आला. कुठला तरी जीवघेणा परफ्यूम आसमंतात दरवळला. शेलाट्या बांध्याची, केतकी वर्णाची, काळ्याभोर डोळ्यांची, अठ्ठावीस -तीस वर्षांची एक तरुणी – तरुणीच ती! – गर्दीतून वाट काढत पुढे आली. आकाशी रंगाची साडी, बिनबाह्याचा ब्लाऊज, चेहऱ्यावर माफक मेकअप, केसांची कुठली तरी आधुनिक रचना आणि तीत माळलेला ताजा मोगरीचा गजरा – प्राध्यापकांपैकी निम्मे जागीच गारद झाले. असंख्य दिलांचा खातमा करत ती तरुणी थेट प्रणेत्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसली.
“मंडळी,” प्रणेते घसा साफ करून म्हणाले ” माझ्या खाजगी सचिवांची ओळख करून देतो…”
“माझं नाव रीतू” ती सुंदरी म्हणाली.”रीतू नाडगौडा”.
 
 

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

24 Responses to पहिला दिवस-1

 1. माधव कुळकर्णी कहते हैं:

  अरे बापरे हसून हसून पुरी वाट लागलीय माझी – :))
  शब्दच सुचत नाही व मी स्क्रिन कडे बघून इतक्या मोठ मोठ्याने का हसतोय हे न कळल्याने अख्खे घर काळजीत पडलेय !
  जबरदस्त शतक ठोकलेत हो सन्जोप….. =))
  आता प्रशासकांनी ह्या मिश्किलीला परवानगी नाकारून आपल्या सर्वांवरच अन्याय केला आहे असेच म्हणावे लागेल…. 😛
  इतक्या सुरेख टवाळखोरी बद्दल अभिनंदन….
  लगे रहो और भी आने दो । हम तय्यार है हसींका खजाना लुटने के लिये…… 🙂

 2. प्रमोद देव कहते हैं:

  संजोपजी नमस्कार!
  जियो!!! खरेच तुम्ही कमाल केलीत. इतके मस्त लिहिलेले आहे की बर्‍याच दिवसांनी मी खळखळून हसलो. तुमच्या निरीक्षणाला(व्यक्ति आणि त्यांचे स्वभावविशेष) आणि नेमक्या शब्द योजनेला दाद द्यावीशी वाटते. हा लेखन प्रकार(चिमटे आणि चापट्या मारण्याचा) तर आपला हातखंडा झालाय. मला आजच्या लेखाच्या एकूण धाटणीवरून आचार्य अत्र्यांऐवजी ठणठणपाळांची आठवण आली.
  पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत आहे. जास्त वाट बघायला लावू नका.

 3. मिलिंद फणसे कहते हैं:

  वा वा रावसाहेब, काय मस्त लिहिलेत. धमाल आली. परंतु अशा निर्विष गुदगुल्या आणि चिमट्यांत मनोगताच्या प्रशासकांना आक्षेपार्ह काय दिसले तेच कळत नाही. इतक्या टोकाच्या सेन्सरशिपमुळे नुकसान मनोगताचेच होईल हे त्यांच्या कंपूतील, चुकलो, विश्वासातील कोणीतरी त्यांना समजवायला हवे.

 4. जयश्री कहते हैं:

  संजोप…. वा………मजा आ गया 🙂 क्रमश: आहे ना ??

 5. नीलकांत कहते हैं:

  वा ! रावसाहेब खुप छान लेख दिलात हो . सगळे लोक समोर आलेत. लेख क्रमश: आहे ना? पुढच्या भागांसाठी आतूरतेने वाट पाहतोय.

 6. Archana कहते हैं:

  ha ha pu vaa. kaahi kaahi vakye tar evadhi jabaraat aahet ki bas re baas! kramashaha aahe na?

 7. sanjopraav कहते हैं:

  इथे येऊन हा लेख वाचण्याचे कष्ट घेतलेल्या सर्वांचे आभार. लेख आवडला आणि त्या अनुषंगाने माझी विनोदाची जाण वगैरे यावरही आपण मोकळेपणाने लिहिले, बरे वाटले. अगदी नम्रपणे काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छीतो.
  लेखातील सर्व पात्रे (नाडगौडा बाई सोडून – शिंत्रे गुरुजींविषयी कल्पना नाही) खरी आहेत. आता लेख लिहून तो प्रसिद्ध झाल्यावर त्यांचे अस्तित्व नाकारण्याचा पळपुटेपणा मी करणार नाही. लेख वाचून झाल्यावर लेखात उल्लेख केलेल्या बऱ्याच मंडळींनी मला ‘मनोगत’ वर व्य. नि. पाठवून आणि दूरध्वनी करून मी त्यांची खिल्ली उडवली असली तरी ते त्यांना फारच आवडले, असे सांगितले. या लेखाला ‘मनोगत’ वर प्रसिद्धी का नाकारण्यात आली यावरही बहुतेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
  हे लोक जसे मला दिसले, तसे मी ते रंगवले. त्यासाठी त्यांची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती आणि नाही असे मला वाटते. विनोदनिर्मितीसाठी जेवढी अतिरंजकता आवश्यक असते, तेवढी करण्याचे मी स्वातंत्र्य घेतले. त्यातही माझ्या वकूबानुसार मी तारतम्य वापरून कुणी जखमी होणार नाही याचा प्रयत्न केला. विनोदच म्हटल्यानंतर इतपत टवाळकी क्षम्य -किंबहुना आवश्यकच आहे, असे मी मानतो. यापूर्वीही ‘मनोगत’ वर ‘मनोगती संमेलना’चे भाग लिहिताना मी हे स्वातंत्र्य घेतले होते. एखादा अपवाद वगळता ते कुणालाही खटकले नव्हते.
  आता जो वाद निर्माण झाला आहे, तो या लेखाला आलेल्या एका प्रतिसादामुळे आहे, असे दिसते. याबाबत मूळ लेखक काय करू शकतो हे मला कळत नाही. राहिला प्रश्न तो माझ्या तथाकथित ‘लोकप्रियते’ मुळे या प्रकारचे लिखाण वाढीस लागण्याचा. या लेखाने स्फूर्ती घेऊन कुणी असे – आणि कदाचित अधिक टोकदार -लिखाण करेल एवढा या लेखाचा जीव नाही. हा माझा विनय वगैरे नाही. एखादा महिना जाऊ द्या, लोक हे सगळेच विसरलेले असतील. त्यामुळे या कशालाच शाश्वत मूल्य काही नाही. आहे ती घटकाभराची गंमत. जरा आपल्या रुद्राक्षांच्या माळा काढून ठेऊन थोडेसे हसूयात… एरवी गांभीर्य सगळीकडे ओतप्रोत भरलेले आहेच!

 8. Vinayak Gore कहते हैं:

  Sanjop Rao

  The article is just terrific! Keep it up. I did not find anything objectionable in the way you have written about anyone including yours truly.So all the fears expressed by people about someone taking inspiration from you and writing something that hurts others are baseless.

  It is indeed surprising and inexplicable that this article was not found worthy of publication on manogat.

  Waiting for the next episodes.

  Regards

  vinayak

 9. sati कहते हैं:

  संजोपराव , सुंदर लेख!
  मनोगतावर प्रसिद्ध होउ नये असं यात काही आहे असं वाटत नाही.
  खूप दिवसांनी काही चुरचुरीत वाचायला मिळाले.
  साती

 10. sarvasaakShee कहते हैं:

  नमस्कार रावसाहेब.

  आपल्याला माझी प्रतिक्रिया माहित आहेच. मात्र इथे अलेल्या प्रतिक्रियांनंतर हे लिहावेसे वाटले:

  अहो कुणाची खिल्ली उडवायची तरी त्याच्याशी तितकी जवळीक असाअवी लागते, नपेक्षा ते टिंगल या सदरातही मोडु शकते. आपण आपल्या मित्रपरिवाला आणि आम्ही आपल्याला चांगलेच ओळखतो. तेव्हा विचार न करता बिनधास्त आपल्या मित्रांची ‘करुन टाका’ – जरा काही खमंग खुसखुशीत वाचायला मिळाले की बरे वाटते. आपण लिहा आम्ही वाचू. आपण कोणतीच सीमा ओलाण्डणार नाही याची खात्री आहे.

  जाता जाता: हा लेख वाचला, मजा आली, तेव्हा उगाच ‘मनोगताचा’ उल्लेख प्रतिक्रियांध्ये कशाला असावा? तिथे नाकारले ते इथे साकारले. बस्स! संपले.

 11. राजीव अनंत भिडे कहते हैं:

  संजोप,
  तुझी निरिक्षणशक्ती सहीच आहे. बोले तो लेख वाचून मजा आ गया. आम्हालाही तुझ्या आणि तात्याच्या महाविद्यालयात प्रवेश हवा आहे.

  तात्याची प्रतिक्रिया पण सहीच आहे.

  तुझ्या पिरंगुटच्या बंगल्यावर मस्त धमाल आली होती. पुन्हा कधी बोलावतोस?

  राजीव अनंत भिडे.

 12. Shashank कहते हैं:

  भांडणकला महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभांचा वृत्तांत छानच आहे. लगोलग कलेचे प्रात्यक्षिकही दाखवल्याबद्दल सहभागी शिक्षकवृंदांचे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच!

  पण तासाला उशीरा आलेल्या माझ्यासारख्या लोकांना या आधी झालेल्या बऱ्याच गोष्टींचा तपशील लागत नाही आहे. कोणीतरी त्यावर अभ्यासपूर्ण लेख (ब्लॉग) लिहिला तर बरे होईल.

  या लेखाचा दुवा दिल्याबद्दल माधवरावांचे आभार. मनोगतींच्या ब्लॉगांवर लक्ष ठेवावे लागणार आहे असे दिसते.

  पुढील तासाच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

  शशांक

 13. Amit कहते हैं:

  rav saheb farach chaan lekha… chitta hyaani suchavalele brid vakya tar apratim..khaar rav saheb touch.. manogatala purna alaani karanaryaa velankarach nishedh.. tya babatit kadhi navhe te tyatyanshi patate.. nidaan 2 olicha khulasa tari hyaa bindok prashasakane karayala hava hota ase vatate!! aso shekado marathi manasanchya milalelya premacha velanakar gair fayada ghet aahe ase tyanchya hukumshahi mule vatat aahe.. pan kay bolanar? aapapale blogs ughadalele bare!!
  satat baap melyagat tond asanaarya tya fokalichya velankarala pan ghya tumchya hyaa tavalkit… tyala ka discount?
  *kuthehi sabhya panachi patali na olandalela ha pratisaad aapan krupaya jasa chya tasa prakashit karava hi haat jodun vinanati!

 14. लिखाळ कहते हैं:

  नमस्कार रावसाहेब,
  आपल्या अनुदिनीला आज प्रथमच भेट दिली आणि हा अतिशय खुशखुशीत लेख वाचायला मिळाला. मजा आली. मी कोणाच मनोगतील प्रत्यक्ष पाहिलेले नसुनही सर्व पात्रे डोळ्यासमोर आली. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.

  [स्वगत: इतके दिवस मनोगत वरिल ‘घडामोडिंविषयी’ताजे राहण्यासाठी सर्व प्रतिसाद (उपप्रतिसाद मुख्यत्वे) तपासावे लागत. ‘आपापसात’वर सुद्धा नजर ठेवावी लागे. आता मनोगतिंचे ब्लॊग सुद्धा चाळावे लागणार तर ! :)]

  शुभेच्छा,
  –लिखाळ.

 15. जयश्री कहते हैं:

  संजोप…….अहो पुढे लिहा ना……..किती वाट बघायची ती… 😦
  त्या नाडगौडा रीतूचं आगमन कधीच झालंय….. आता statue poistion मधे कितीवेळ ताटकळत ठेवणार…. हे तर त्या टिव्हीवरच्या मालिकांपेक्षाही भारी झालं 😉

 16. techmilind कहते हैं:

  संजोपराव,

  तुझ्या कॉलेजात मी आलो
  खुळ्यागत भांडणे आले

  गझलसम्राट (हा अत्यानंदांचा शब्द) चित्त ह्यांची ही गझल आठवली. चालू द्या। पुढच्या लेखाची वाट पाहतोय.

  दरम्यान भांडण महाविद्यालयाच्या खऱ्या प्राचार्या असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख नसल्याने तिला राग येणे स्वाभाविकच आहे.

  – सर्किट

 17. techmilind कहते हैं:

  रावसाहेब, आणि वाचकवर्ग,

  मनोगताविषयी मी लिहिलेले एक स्फुट http://thebhandarkars.com/milind/archives/86 येथे वाचा. आणि नवीन योजनेत सहभागी व्हा.

  – सर्किट

 18. प्रशांत मनोहर कहते हैं:

  संजोप राव,
  मी मनोगतवरचा फक्त एक वाचक आहे. आजपर्यंत मी तिथे एकाही शब्दाचे लेखन केलेले नाही. मी आपले लेखन नेहमी आवडीने वाचतो. आपणही जी ए प्रेमी आहात आणि मीही आहे. हा लेखही खरोखरच छान झाला आहे. यातल्या विनोदशैलीला आणि निरिक्षणशक्तीला मनापासून दाद द्यावीशी वाटते. इथे आपण हा लेख टाकला आहे हे मला जरा उशिरानेच कळले.

  तात्यांचेही म्हणणे चुकीचे नाही. तात्यांचा प्रतिसाद थोडा तिखट आहे खरा, पण त्यावरून एवढा वादंग का झाला हे कळत नाही. तात्यांची शैली अशीच तडकफडक आणि मनमोकळी आहे. आबा जोशी, बुवा, शिंत्रेगुरुजी यांसारखी एकाहून एक सरस व्यक्तिचित्रे लिहिणारा तात्यांच्यासारखा एक विलक्षण संवेदनशील आणि मनस्वी लेखक, एक जिंदादिल माणूस आज मनोगताने गमावला आहे.

  एकूण झाला प्रकार वाईटच झाला.

  प्रशांत.

 19. गावंढळ कहते हैं:

  राव दादा,
  लई झ्याक लिहिलंया बगा. आनि भाग २ बी लिवा बिगी बिगी. आमी तुमचे लई फ्यॅन बगा.
  आरं माज्या कर्मा. येक काम लई वंगाळ झालं बघा. तात्या मनोगतावरून कुठं गेलं म्हनतो मी? रावदादा तुमीच त्यास्नी परत माघारी बोलवा बरं का. तात्या मनोगतावर नसत्याल तर मनोगतावरच्या त्यांच्या मैतरणीस्नी आनी आयाबहिनीस्नी चैन कसं पडायचं म्हनतो मी! तसं तात्या लई चालू मानूस बरं का! पर जंक्शन आसामी म्हना की!

 20. techmilind कहते हैं:

  मनोगताच्या (आगामी) मरणाची पूर्वसूचना देणाऱ्या माझ्या याआधीच्या लेखाला अनेकांचे पाठींबा देणारे प्रतिसाद आलेत. मनोगताला संपूर्ण लोकशाहीवादी पर्याय उपलब्ध करून देण्याची पहिली पायरी म्हणून मी आज exmanogati हा याहू गट सुरू केला आहे. पर्यायी संकेतस्थळाचे स्वरूप कसे असावे याबद्दल आपण तिथे चर्चा करूया. त्या गटाचे सदस्य व्हावे, ही विनंती. (मॉडरेशनची हुकुमशाही मला पसंत नाही, परंतु त्या गटावर व्हायाग्राच्या जाहिराती यंत्रांकरवी टाकल्या जाऊ नये म्हणून लिहिण्यासाठी सदस्य होणे आवश्यक आहे.)

 21. पिंगबैक: DesiPundit » Archives » पहिला दिवस

 22. interior led lights for cars कहते हैं:

  Well, at least Al Gore is right concerning global warming, right? Or is he? He says it was man-made, not just earth’s normal cycle over thousands of years. You think?

 23. aa@aa.com कहते हैं:

  aai zhava tya tyatyachi…. bhenchod kuthli paidas ahe mahit nahi.. randa nachavto, daru peeto ani tari haa mhane khara sahityik ani khara rasik.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s