पहिला दिवस -२

रीतू नाडगौडाच्या स्वर्गिय सौंदर्यानं पुरुषवर्गाची अशी पाडापाड चाललेली असताना सर्किट व टग्या अद्यापि गोळेकाकांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या भाषांतरातच अडकले होते.
“हे बघ,
डोळ्यातल्या डोळ्यात संकेत झाला गं
बसल्या बसल्या जगण्याचा आधार झाला गं…” सर्किट.

“हां, असं त्या केशवसुमाराच्या हातात कोलित दे ,म्हणजे तो आहेच लगोलग विडंबन पाडायला..

‘डोक्यातल्या डोक्यात उवा झाल्या गं
नाव सटवे तुझे ‘केशवा’ ला कळ्ळंय गं’..”
“वृत्तात बसत नाही हां”
“केशवाची विडंबनं तरी कुठं बसतात वृत्तात?”
“अरे, पण बाटली, लोळणे, माडी यातलं काही नाही? मग ते केशवाचं विडंबन कसलं म्हणायचं?”
“हां, ते बाकी खरंय म्हणा”

आता एक नवीनच चेहरा समोर आला होता. तरुण वयाचा पण अत्यंत गंभीर चेहऱ्याचा हा कोण असावा याचा श्रोत्यांना काही अंदाजच येईना.आपल्या चेहऱ्याइतक्याच गंभीर आवाजात त्या तरुणाने बोलायला सुरुवात केली
“एखाद्या जख्ख पुरातन काळसर्पाने आपली एखाद्या पाकळीइतकीइतकी पातळ कात टाकून द्यावी तसे माझे कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखे आयुष्य त्यागून मी इथे आलो आहे. गतायुष्याचे चिकट हिरवे विषारी गोळे मी एकेक करून कालपुरुषाच्या कराल जबड्यात फेकून दिले आहेत. एखाद्या लूतभरल्या उंटाने वाळूच्या वादळात आपल्या फुरफुरणाऱ्या नाकपुड्या बंद करून घ्याव्यात तसे भूतकाळाचे लसलशीत लाल झापड मी कायमचे ओढून घेतले आहे. पण हे करत असताना माझ्या मनात एक अस्वस्थ, सुगंधी, पोपटी उत्सुकता आहे. आता पुढे दिसते आहे ते चुळूकभर मृगजळ की आईच्या पदराएवढा महासागर, माझ्या हातात येणार ती नम्र, शांत पूजानिरांजने की आंधळ्या डोळ्यांनी सरपटणाऱ्या बिलबिलीत गोगलगायी, माझ्या पावलांवर पडेल ते स्निग्ध, सुगंधी चंदनशिंपण की लालभडक, जळजळीत तप्त तेलाची धार— कुणास ठाऊक…”
त्याच्या एकेक वाक्यासरशी सवत पोटुशी आहे हे कळाल्यावर एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर उमटावा तसा मत्सर प्रदीप. सन्जोप आणि कोलबेरच्या चेहऱ्यावर उमटत होता. आपल्या खास राखीव कुरणात शिरलेला हा अनाहूत खोंड कोण हेच त्यांना कळत नव्हते. आणि दुसरेकडे त्या गंभीर तरुणाचे भाष्य सुरुच होते.
” एखाद्या प्राण्याच्या सडत चाललेल्या शरीरावरचा मांसाचा शेवटचा तुकडा एखाद्या हावरट तरसाने हिसकावून घ्यावा तशी माझ्या आयुष्यावरची कृतज्ञता माझ्या भूतकाळाच्या करवती कवटीने गिळून टाकली आहे. पण मूळ त्वचेपेक्षा सांगाडाच अधिक तेजाने तळपावा तसे माझे विनापाश, वस्त्रहीन मन आता चिंचेने घासलेल्या तांब्याच्या तबकासारखे स्वच्छ. निर्मळ झाले आहे.एखाद्या एकाकी पडावावरील लुकलुकत्या दिव्यावर असंख्य कीटकांनी झेप घ्यावी तशी माझ्या मनाची पाकोळी आता सतत एकाच दिशेने अविचल उडू पहात आहे. या दिशेला  मराठी भाषेची कुसर केलेली अतितलम पण रेखीव पावले उमटली आहेत. सुतरफेणीच्या पदरासारखे हे मराठी भाषेचे झुळझुळीत वस्त्र या महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर पायघड्यांसारखे अंथरताना मी स्वतःच अगदी मऊ, बिनसुरकुतीचा झालो आहे. आता अपेक्षा इतकीच, या वस्त्रावर सरस्वतीच्या मोरपंखी सुरांनी कशिदा विणला जावा. रोख, व्यवहारी अभंड हुच्च पावलांनी हे वस्त्र अगदी मलिन होऊ नये…”
श्रोते अवाक होऊन ऐकत होते. तो गंभीर चेहऱ्याचा तरुण एक पायरी खाली उतरला आणि तेराव्याचे मंत्र म्हणणाऱ्या गुरुजींच्या गंभीरपणे म्हणाला, ” माझे अस्तित्व अति पिकलेल्या जर्दाळूसारखे नगण्य पण अस्सल आहे, माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”
प्रत्येकजण शेजाऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजू लागला. पहिल्या रांगेत बसलेल्या कारकून आणि मीरा फाटक यांचे बोलणे बाकी ध्वनिवर्धकामुळे सगळ्यांच्या कानावर पडले.
” काय म्हणत होता गं हा?”
“काही नाहे गं, इथं मराठी शिकवणार आहे म्हणे हा!”

दरम्यान महाविद्यालयाचे प्रणेते कुठेतरी गायब झालेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. ‘मराठीतल्या कुठल्या शिव्या सभ्य आणि कुठल्या असभ्य ‘ याविषयीची अद्यावत माहिती मिळवण्यासाठी ते आणि रीतू कुठेतरी गेल्याची चर्चा सुरु होती. विशेषतः ‘माय…’ या अक्षरांपासून सुरु होणाऱ्या शिव्यांविषयी त्यांना विशेष प्रेम असल्याचे कुणीसे म्हणाले. ” बरोबरच आहे. ‘माय..’ विषयी त्यांना आता विशेष आपुलकी असणारच” सर्किट म्हणला. “माय म्हणजे माझे, माय म्हणजे आई…”
“आणि माय म्हणजे मायबोली! खि… खि…खि…” मारणाऱ्याचा हात धरता येतो हो पण…

“जे इतिहास विसरतात, त्यांना लवकरच भूगोल विसरावा लागतो” खणखणीत आवाजात सर्वसाक्षीने सुरुवात केली. चिनी भाषेत याला एक फार समर्पक म्हण आहे. ‘ जे हिंग टुंग, ते पिंग दोन टुंग…’
“गालिब म्हणतो, ‘वदाअते गुल्दुस अता खुल्दुस ता मुंगुस…'” दिगंभाच्या कानात चित्त 
“सह्याद्रीच्या दगडादगडावर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडले आहे,इथल्या मातीच्या कणाकणावर इथल्या क्रांतिकारकांचा घाम सांडला आहे, इथल्या फत्तराफत्तरावर इथल्या शहिदांचे…” इथे काहीतरी सांडवून सर्वसाक्षीला तो तिय्या जमवायचा होता. पण ते न जमल्याने तो उगीचच खाकरला  “शहिदांचे अं…..नाव कोरलेले आहे. पण आज या शहिदांची याद कोणाला आहे?  जो तो आपल्या ह्याच्यात आहे. अरे, हे शहीद नसते तर आजवर गुलामगिरीत खितपत पडलो असतो आपण! आणि स्वराज्य म्हणे अहिंसेने मिळालं! स्वराज्य काय असं उपास करून मिळतं? अबे छोड!” इथे सर्वसाक्षीचे आवेशयुक्त हातवारे खेडुताच्या गालाला निसटता स्पर्श करून गेले. खेडुत “बायलीला..” का असं काहीसं पुटपुटला. सर्वसाक्षीच्या हाताला झिणझिण्या आल्या. ” आज या शहिदांच्या आठवणीने डोक्याला झिणझिण्या – आपलं- मुंग्या येतात. हीच राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात पेटली पाहिजे. या अपृष्ठवंशीय तरुणांच्या पाठीचे कणे ग्रॅनाईटचे झाले पाहिजेत. या राष्ट्राच्या अभिमानाचा – जाज्वल्य अभिमानाचा…”
“जाज्वल्य? ह्या म्हमईकराला ह्यो पुनेरी शबुद कसा गावला म्हनायचा? वातकुक्कुट ह्योच तर न्हवं?” खेडुताचा माधव कुळकर्णीला प्रश्न.

“ओ, मुद्द्याचं बोला…” 
“ओळख करून द्या आणि बसा हो खाली”
“तुमची राजकारणी मतं ऐकायला नाही आलो हो इथे…”
“वाटलं तर तुम्ही नका गांधिगिरी करु..”
“हो.. पोष्टाची तिकिटं उलटी लावा”
” नोटा वापरू नका”
“घेऊही नका… खि…खि…खि…”
“ड्राय डे पाळू नका…”
अशा गदारोळात इतिहासाचे प्राध्यापक सर्वसाक्षी खाली बसले.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

20 Responses to पहिला दिवस -२

 1. केशवसुमार कहते हैं:

  खो खो खो.. ह. ह. पु. वा.
  आणि कुठले विधी पण नाहीत मग माझ विडंबन नक्कीच नाही…

  मारणाऱ्याचा हात धरता येतो हो पण…
  हे बाकी खरं बोलात..
  पुढचा भाग लवकर येऊ द्या..
  अवांतर.. तुम्ही गझल वगैरे लिहा ना जरा.. म्हणजे मला पण परत पोच देता येईल… 😉

 2. techmilind कहते हैं:

  खल्लास !

  जे हिंग टुंग, ते पिंग दोन टुंग…

  ही चिनी म्हण तर उच्च !

  अरे, पण बाटली, लोळणे, माडी यातलं काही नाही? मग ते केशवाचं विडंबन कसलं म्हणायचं?”

  ह्याला म्हणतात एका वाक्यात समीक्षा। वा संजोपराव !

  माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”

  हे वाचून तर हसता हसता ठसका लागला !

  आणखी येऊ द्या !

  – सर्किट

 3. माधव कुळकर्णी कहते हैं:

  हा हा हा
  मस्तच जमलाय हा भागही- थोडा छोटा झाला,
  असो, आता तिसरा भाग लवकर टाकून ह्याची कसर भरून काढा सन्जोपराव….
  केशवसुमारांचे विडंबन, छू चे मराठी व साक्षींचे चायनीज विशेष आवडले-
  कापूसकोंड्याचे काय म्हणालात ते नाही नीट कळले !
  अर्थात ओंकार अमेरिकेवरून परतल्यावर त्यालाच विचारावे म्हणतो….
  बाकी काही नाही हो…..
  माझ्या सर्वात जवळचा (म्हणजे जवळ राहणारा) मनोगती तोच तर !

 4. techmilind कहते हैं:

  आत्ताच मनोगताच्या प्रशासनाचा एक उत्तम नमुना बघून आलो. सर्वसाक्षींनीच्या “छून च्ये” ह्या लेखाला चित्त ह्यांनी काल दिलेला प्रतिसाद असा होता:

  मला वाटलं की “छून च्ये” हा कुणी चिनी हिंदुत्ववादी क्रांतिकारी आहे की काय?

  काल हा प्रतिसाद वाचून मी खोखो हसलो. माझे ते हसणे सध्याच्या सुतकी मनोगतावर शोभले नसेल. आज चित्त ह्यांचा तो प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे काढून टाकलेला आहे.

  – सर्किट

 5. संजोपशेठ,
  चालू द्या. छान सुरू आहे. प्रणेत्याना दूर कोठेतरी रितूबरोबर धाडलंत ते बरंच केलंत! 😉 प्रणेते आता जरा निवांतपणे रितूबरोबर गुजगोष्टी करतील. त्यांचं आणि रितूचं तसं जुनच लफडं आहे, पण अजूनही ताजंटवटवीत आहे. 😉

  मस्तच लेख, पुढचा भाग लिहा लवकरच…

  आपला,
  (रितू नाडगौडाच्या लफड्यातला) तात्या.

 6. yogesh कहते हैं:

  माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”

  तेराव्याचे मंत्र म्हणणाऱ्या गुरुजींप्रमाणे गंभीर रहावे की उष्ण वाळवंटातल्या पुरातन सर्पाप्रमाणे फिस्सकन दात दाखवून हसावे याचा गोंधळ झाला आहे.

  आणि त्याने मराठी शिकवायला सुरुवात केली तर सर्व मुले शाळेत येण्याआधी एखाद्या हट्टी खेचराप्रमाणे मागल्या पायात लंगडू लागतील

 7. प्रमोद देव कहते हैं:

  संजोपजी नमस्कार!
  हा भागही मस्त जमलाय! ह्या मधे आपण पुलंच्या शैलीचे यथायोग्य अनुकरण केल्याचे दिसतेय.मधु मलुष्टे,सखाराम गटणे इत्यादिंची आठवण करून दिलीत.
  आपण शास्राचे प्राध्यापक असूनही भाषेवर पकड उत्तम आहे. हा तुमचा गुण खरेच अनुकरणीय आहे.
  ***
  जे हिंग टुंग, ते पिंग दोन टुंग…

  ही चिनी म्हण तर उच्च !

  अरे, पण बाटली, लोळणे, माडी यातलं काही नाही? मग ते केशवाचं विडंबन कसलं म्हणायचं?”

  ह्याला म्हणतात एका वाक्यात समीक्षा। वा संजोपराव !

  माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”

  हे वाचून तर हसता हसता ठसका लागला !

  ह्या मिलिंद ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.

  पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

  प्रमोद देव

 8. Pradeep कहते हैं:

  Sanjop,

  GA’s spoof, and Sarvasaakhi’s Chinese saying were simply outstanding!

  I envy you.

  I envy you.

  I envy you.

  Baaki kaay lihoo?

  Regrds,

  Pradeep

 9. anu कहते हैं:

  Raav saheb,
  Donhi bhag aapli jabardast nirikshanshakti dakhavatat. Ha bhag, khas karun ‘chini’ vachun solid hasale.

 10. खेडूत कहते हैं:

  संजोप राव,

  लेख फक्कड जमल्याला हाये.. आजकाल तुमी हितं लिवताय ह्ये मला अडन्याला कुनी सांगीतल्यालच न्हाय! त्यो परशासक माजं लिवल्यालं अर्धं म्येसेज डिलिट करतो.. आनि माजी यक्तिगत निरोप सुविदाबी बंद केल्याली हाये. (आनि गंमत म्हंजी मी आजपर्यंत येकालाबी यक्तिगत निरोप पाटवल्याला न्हाय.. आनि तिकडं नविन बाई मानसांना निरोप पाटवनाऱ्यांची खाती तेजीत चालू हायेत).. पनं तुमचं लिवल्यालं वाचून लै आवडलं बगा.. जुनं दिवस आठवल.. मनोगत वरच्या फायटिंगची लै आठवन येतीया ..आमची टवाळकी पाक बंद झालिया बगा (परशासकाला मानलं पायजे बरका!) लै बोर मारतया…

  – खेडूत

 11. चित्तरंजन कहते हैं:

  मस्त लिहिले आहे सन्जोप राव! प्रदीपने वर प्रतिसादाखातर लिहिलेली इंग्रजी-मराठी कविता पुन्हा उद्धृत करतो—

  I envy you.
  I envy you.
  I envy you.
  Baaki kaay lihoo?

  चित्तरंजन

 12. सचिन म्हेत्रे कहते हैं:

  रावसाहेब,

  धम्माल केलीत हो … अप्रतीम !!!

  –सचिन

 13. >>(आनि गंमत म्हंजी मी आजपर्यंत येकालाबी यक्तिगत निरोप पाटवल्याला न्हाय.. आनि तिकडं नविन बाई मानसांना निरोप पाटवनाऱ्यांची खाती तेजीत चालू हायेत)..

  अरे खेडुता, त्या सगळ्या ‘संवाद साधण्याच्या कला’ आहेत बाबा! आपण काय एवढे थोर कलाकार नाय बा! सभ्यतेच्या आणि सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करायच्या आणि नवीन नवीन बायकांना च्यामारी चोरून व्य नि पाठवायचे! संवाद साधायचा हा प्रकार खरंच लई भारीच म्हणावा लागेल! 😉

  आपला,
  (चमडीचोर!)तात्या.

 14. chakrapani कहते हैं:

  रावसाहेब,
  उत्तम निरीक्षणशक्ती, विनोदबुद्धी आणि प्रछ्छन्न कल्पनाविलास यांचा संगम म्हणजे तुमचा “पहिला दिवस” तुमच्या या लेखनकौशल्यास मनापासून दाद देतोय. लिहीत रहा. अनेकानेक शुभेच्छा.

 15. Chakru कहते हैं:

  प्रछ्छन्न कल्पनाविलास !! mhanaje re kay chakru?

  “rav saheb, tumachya hya kalpana vilasa madhe mala pan dya ki ekhada role.. mi pan tasa baryapaike manogatavar padik asato”…”hech” suchavanyasathi varachi makhalashi aahe he tumachya tallakha dokyat aalech asanar..

  hee hee ghya hyala pan ghya ho tumachya pudhachya bhaagat.. tashya gazala bizala barya karato thodya far.. hee hee hee

 16. santosh कहते हैं:

  आज सकाळी ऑफिसच्या पार्किंग लॉट मधुन येताना “नानी” दिसली. तिच्या लाल मुस्टांग मधुन ती बाहेर पडली. आरथ्रायटीस मुळे सावकाश तिची पावले ऑफिसच्या दिशेनी पडत होती. लाल स्वेटर घातलेला, हातात एक लाल पर्स. पुर्वी एकदा तिची लाल लॅपटॉप बॅग बघुन मी तिला म्हट्लेलं,
  “अहो, लाल तुमचा आवडता रंग का?”
  तेव्हा “तुला कसं माहित?”चा केवढा मोठ्ठा सुखद धक्का बसलेला “नानी”ला!

  नानीचं नाव मारिलिन कॅपियेलो. ६ महिने आधी, ऑफिसमध्ये आम्ही शेजारी-शेजारी बसायचो. रोज सकाळी ८.३० ला नानी न चुकता येणार; दुपारी १२-१ लंच टाईम मधे खालच्या कॅफे मधुन सलाड घेउन येणार, आणि त्याबरोबर कुठलं तरी पुस्तक वाचणार; डेस्कवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीशी मृदु बोलणार; अगत्यानी चौकशी करणार; दुपारी कधीतरी कुठल्यातरी मैत्रिणीला फोन करणार आणि थोडा वेळ गप्पा मारणार; ५.३० झाले की घरी जायची तयारी तिची!

  ऑफिसमधे बसायची ती सर्वात मस्त जागा होती आमची – टॉप फ्लोरवरची कोपऱ्यातली जागा – आम्हा दोघांचे डेस्क window facing – खाली छोटंसं तळं, दूर पाहिलं तर एका बाजुला टॅम्पाचं रेमंड जेम्स अमेरिकन फुटबॉल स्टेडियम, त्याच्या पाठीमागे टॅम्पा विमानतळावरुन येणारी/जाणारी विमानं.

  सकाळी आलं की खिडकीतुन बाहेर पाहुन मी आणि नानी हमखास weather वर गप्पा मारायचो.
  “आज काय मस्त sunny आहे.”
  “आज पाउस पडणार.”
  “आज थोडं dull आहे – पाउस नाही, पण sunnyदेखिल नाही.”
  “आज खूप छान आहे – nice, clear, blue skies – इथे ऑफिस मधे बसण्यापेक्षा कुठेतरी पिकनिकला जायल हवं.”
  अशा आमच्या गप्पा.

  पाउस सुरु झाला की कॉफीचा मग घेउन मी त्या काचेपाशी उभा रहायचो. काचेवर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पहात रहायचो. गरम कॉफीच्या वाफेतुन मधेच मागे वळुन नानीला म्हणायचो,
  “किती छान आहे ना?”
  ती पण हसुन मानेनी होकार द्यायची.

  Mothers Dayला “नानी” खूप खुश होती.
  “माझ्या मुलानी न्युजर्सीहून मला गिफ्ट पाठवली आहे.
  पण मी ती गिफ्ट आज नाही उघडणार.
  संडेला उघडणार आहे.
  He loves me so much.”
  हे मला सकाळी-सकाळी सांगीतलं.
  आणि मग दुपारी डेस्क वरुन आपल्या २-३ मैत्रिणींना सांगीतलं, तेव्हा प्रत्येक वेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.

  नानीच्या डेस्कवर एका काचेच्या बोल मधे ती चॉकलेट्स ठेवते.
  जो भेटायला येईल, तो हवं तर एक-एक उचलतो.
  मी तर बाजुलाच बसायचो.
  आणि माझी नजर नेहमीच असायची त्यावर.
  न चुकता, रोज तिला विचारुन २-३ चॉकलेट्स मागुन घ्यायचो.
  हे तर विचारुन.
  आणि न विचारता अजुन कितीतरी ढापायचो.
  कधी-कधी तिनी मला ढापताना पाहिलं सुद्धा होतं.
  पण प्रत्येक वेळेस आमची नजरा-नजर झाली, की नानी तिचे डोळे मिचकवत,
  “घे रे! तुला आवडतात ना! मग लाजतोस कसला.”
  हे न बोलताच सांगायची.

  आज ती समोर आली तेव्हा हे सगळं आठवलं.
  किती दिवस झाले आहेत, नानीशी weatherबद्दल गप्पा मारुन, तिच्या डेस्कवरुन चॉकलेट्स घेउन.
  गेल्या पावसाळ्यात जुलै मधे शेवटचं भेटलेलो तिला. त्यानंतर मी आता दुसऱ्या बिल्डिंग मधे बसु लागलो आहे. पुर्वीच्या जागी जायची कधी संधीच मिळाली नाही.
  मध्यंतरात autumn has gone by, winter is also behind us.
  spring has now come back at our doorstep.

  पण नानी बदलली नाहीये. अजुनही लाल रंग तिला तितकाच आवडतो.
  आजही तिनी पाहिल्यावर डोळे मिचकवलेच.

  आणि न बोलता हसत-हसत सांगुन गेलीच,
  “काय रे? कुठे गायब आहेस इतके दिवस?
  चॉकलेट्स आवडत नाहीत का तुला आता?
  मला भेटायला आलाच नाहीस.”

 17. Prasad Dudhgaonkar कहते हैं:

  अफलाफतून!
  तात्यांच्या संकेतस्थळावरून भेट दिली. जरी मला लेखामध्ये उल्लेखलेल्या व्यक्तींबद्दल कल्पना नसली तरी हे सांगू शकतो की व्यक्तीचित्रण सुरेख केले आहे. सर्वात आवडल्या त्या छू ने वर्णलेल्या उपमा… 🙂
  तिसरा भाग येईल अशी अपेक्षा ठेवतो.
  अनेक शुभेच्छा!

 18. पिंगबैक: पहिला दिवस | DesiPundit

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s