हे काय नशीबी आले

हे काय नशीबी आले हे भाग्य हे असले कसले
बघ निघून गेले वजीर राजे डावपेचही फसले

मी डोळे उघडून बघतो तेंव्हा रात्र पुन्हा उलगडते
या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले

बहार माझा बघता बघता काल सुकोनी गेला
फूल एकटे हाती उरले तेही पण हिरमुसले

डोळे मिटता स्पर्श कुणाचा झाला डोक्यावरती
उग्र विषारी सर्प दुतोंडी जागोजागी डसले

सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटे
चाहूल कसली, जाळीमध्ये काय पुन्हा खसफसले 

पाठ फिरवुनी चालू लागलो आयुष्य चुरगाळोनी
शरीर सोबत, फिकीर कोणा, असले किंवा नसले

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to हे काय नशीबी आले

  1. शुचि कहते हैं:

    >>डोळे मिटता स्पर्श कुणाचा झाला डोक्यावरती
    उग्र विषारी सर्प दुतोंडी जागोजागी डसले>>
    इंटेन्स ओळी!!………………इंटेन्स कविता
    आवडली …….

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s